
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अ.दि.पाटणकर
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी सोहळयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “संतवर्य योगीराज” या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सद्गुरू शंकर महाराजांची शिकवण समाजमनावर व्हावी व संतविचारांचे संस्कार विशेष करून तरूण पिढीवर व्हावेत यासाठी ही स्मरणिका उपयुक्त ठरणार असुन सदगुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टने कोव्हिड काळात सामाजिक बांधिलकी जपत भरीव कार्य केले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदान, रक्तदान व इतर विविध सामाजिक उपक्रम अविरत चालु असुन असेच वृद्धिंगत व्हावेत अशा शुभेच्छा यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्या.
“संतवर्य योगीराज” या स्मरणिकेत मठात रंगावलीच्या माध्यमातून साकारलेल्या आणि महाराजांच्या दिव्यलीला प्रसंगांचे, अलौकीक, गूढ, अनाकलनीय अवतार कार्यांचे सचित्र सादरीकरण करण्याचा प्रयत्न समाधी ट्रस्ट ने केला आहे.
सन २०२२ मध्ये होणारा ७५ वा समाधी सोहळा हा अमृत महोत्सवी सोहळा असुन त्यानिमित्ताने ट्रस्टच्या वतीने दिनांक ०१ मे ते ०९ मे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रकाशन सोहळ्याला समाधी ट्रस्टचे विश्वस्त श्री सुरेंद्र वाईकर, श्री प्रताप भोसले उपस्थित होते