
दैनिक चालू वार्ता चंद्रपूर प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर–
चंद्रपूर तलाठी दप्तरात निष्काळजीपणा बाळगणारा बल्हारपूरचा तलाठी रोहित सिंग चव्हाण यांचे विरोधात परत एकदा बुधवार दि. ४ मे ला एक लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती प्रिया झांबरे यांनी एका भेटी दरम्यान आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना दिली .ही तक्रार सादर करण्या पुर्वी बल्हारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी पाटील यांना देखिल चव्हाण यांच्या तक्रारी बाबत एक निवेदन देवून झाबंरे यांनी सदरहु पटवा-याच्या बाबतीत तक्रारींचा पाढाच वाचला .या शिवाय पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांना देखिल एक निवेदन सादर केले . काही दिवसा पूर्वी राज्याचे मुख्य सचिव व नागपूरच्या महसूल आयुक्त यांच्या कडे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे आणी विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष प्रिया झांबरे तसेच युवराज गजभिये यांनी तलाठी दप्तर मधील रेकार्ड खोडतोड प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे झाबंरे यांनी सांगितले .परंतू उपरोक्त प्रकरणात कोणत्याही दोषी तलाठ्यांवर कारवाई प्रस्तावित न करता तहसीलदार संजय राईंचवार यांनी कार्यालयीन आदेश पारित करीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना रेकार्ड दुरुस्तीच्या कामी लावले आहेत.याच पध्दतीने आदिवासी लोकांना वाटपात दिलेल्या जमिनीची विक्री विना परवानगी झाली असल्यास त्या जमीनी देखिल शासन जमा करण्याचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवावे अशी मागणी सुध्दा प्रिया झाबंरे यांनी या अनुषंगाने केली आहे.