
दैनिक चालू वार्ता नांदुरा- प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.५.खारपाणपट्टय़ातील महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाला अपुऱ्या निधीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे २७ वर्षांपासून प्रकल्पाचे काम अडखळत सुरू आहे. जिगाव प्रकल्प नियोजनाप्रमाणे पूर्णत्वास जाण्यासाठी दरवर्षी सुमारे दोन हजार कोटींची आवश्यकता आहे. मात्र, राज्य शासनाकडून अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद करण्यात येते. विशेष म्हणजे तरतूद केलेली पूर्ण रक्कमही देण्यात येत नाही. गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी ६९ टक्केच निधी प्रकल्पासाठी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर्षी जिगाव प्रकल्पासाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली असली तरी तो प्रत्यक्षात पूर्ण प्राप्त होणे गरजेचे आहे. अन्यथा प्रकल्पाची रखडपट्टी कायम राहण्याची शक्यता आहे.
खारपाणपट्टय़ात पाण्याची मोठी समस्या आहे. या भागात सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी १९९४-९५ मध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यात जिगाव प्रकल्प मंजूर करण्यात आला. गेल्या अडीच दशकांहून अधिक कालावधीपासून प्रकल्पाचे काम सुरू आहे. राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रम व केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेतही प्रकल्पाचा समावेश आहे. अपुऱ्या निधीमुळे प्रकल्पाचे काम गती पकडू शकले नाही. तृतीय सुप्रमानुसार प्रकल्पाची एकूण किंमत १३८७४.९४ कोटी रुपयांवर गेली आहे. प्रकल्प धरण बांधकाम, भूसंपादन, पुनर्वसन, उपसा सिंचन योजना व बंदिस्त पाईप वितरण प्रणाली तसेच इतर कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेत. मार्च २०२२ अखेपर्यंत ५३४७.५५ कोटींचा खर्च झाला. प्रकल्पाची उर्वरित किंमत ८५२७.०४ कोटी आहे. नियोजनानुसार पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १७२७.७३ कोटी आहे,