
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
बारुळ :-कंधार ते गडगा राज्यमार्ग क्रमांक ५६ या रस्त्याची मंजुरी येत्या अर्थसंकल्पात प्राधान्याने करून येत्या पंधरा दिवसात दुरुस्तीचे काम हाती घेऊ तसेच बारूळ ते सोनखेड वरील बामणी पाटी जवळील दोन किलोमीटर रस्त्याचे कामास वनविभागाकडून मान्यता घेऊन रुंदीकरणाचे व मजबुतीकरणाचे उर्वरित काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांनी जनआंदोलन कृती समितीस दिले.दिनांक ३० रोजी बारूळ कॅम्प तालुका कंधार येथे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व केंद्रीय रस्ता निधी अंतर्गत उर्वरित कामाच्या मागणी साठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जनआंदोलन कृती समितीचे अध्यक्ष बाबुराव बस्वदे, एस पी जाधव शिवसांब देशमुख, प्राचार्य निवृत्ती कौंसल्ये यांची भाषणे झाली यावेळी रस्ता दुरुस्त करण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची कामे दिलेल्या मुदतीत व उत्कृष्ट दर्जाचे न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वक्त्यांनी दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी कनिष्ठ अभियंता जाधव आर ये यांनी आंदोलकांशी रस्त्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली व येत्या काळात अधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बोलवण्याचे मान्य केले. यावेळी उस्माननगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते डी ए, बीट जमादार ईश्वर पवार, पोलीस कॉन्स्टेबल बलवान कांबळे, रामकिशन घोरबांड,होमगार्ड पांडागळे, सादिक शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला. रस्ता रोको आंदोलनात बाबुराव बस्वदे, सेवानिवृत्त प्राचार्य निवृत्ती कौशल्ये, शिवसांब देशमुख, एस पी जाधव, प्रदीप हुंबाड, तिरुपती भागानगरे, विश्वंभर पाटील पवळे, बालासाहेब पाटील जाधव, स्वातंत्र्यसैनिक माणिक बकवाड,व्यंकटी पाटील जाधव भाजपच्या सौ. सखुबाई नवघरे, श्रीमती जानकाबाई माधव शिंदे, लक्ष्मण डिदेवार, रसूल पठाण, शिवाजी गंगोत्री, शेख अली, श्रीराम पाटील गायकवाड, बाळू सुरूम वाढ, पठाण मुक्तार, राम पवार, जीवन पानपट्टे, माधव जाधव, रमेश सूर्यवंशी, माधव गालशेतवार, पुंडलिक गालशेतवार, दिगंबर पाटील वडजे, दिगंबर वरवंटे, नारायण कुंभारे, बाळू गायकवाड, दिगंबर विभुते, शंकर पाटील मजरे, बालाजी पाटील सांगवे, पत्रकार शिवाजी पाटील वळसंग वाडीकर, दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी संघपाल वाघमारे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.