
दैनिक चालु वार्ता इंदापूर ग्रामीण प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर – इंदापूर तालुका येथील श्री लक्ष्मी नरसिंह जयंती नवरात्र उत्सव कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच साजरा होणार असल्यामुळे या भागातील भाविक भक्तांचे मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शनिवार दिनांक 7 मे पासून ते 16 मे पर्यंत सुरू आहे. या निमित्त श्री नरसिंह जयंती नवरात्र उत्सव देवस्थान समिती आध्यक्ष प्रमोद दंडवते व सर्व विश्वस्त आणि नरसिंहपुर ग्रामपंचायत आजी-माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दिनांक 7 मे पासुन लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या उत्सवाला सुरुवात होणार सकाळी भजन व मृदंगवादक हे समस्त ग्रामस्थ शेवरे, टणु, पिंपरी बुद्रुक, संगम, गिरवी व नरसिंहपूर या गावातील ग्रामस्थांचे होईल दुपारी ह. भ. प. श्री. हरि प्रसाद देहूकर यांचे प्रवचन होईल व रात्री ह. भ. प .श्री .आनंद काकडे महाराज यांचे कीर्तन व महाप्रसाद होईल. रविवार दिनांक 8 रोजी सकाळी भजनी मंडळ उस्मानाबाद यांचे भजन होईल. दुपारी सौ. संगीता रमाकांत चाटी यांचे भक्ती संगीत होईल. आणि दुपारी ह. भ. प. देविदास महाराज जोशी पुणे यांचे प्रवचन होईल तसेच रात्री ह-भ-प श्री. राम श्रीधर रामदासी उस्मानाबाद यांचे कीर्तन व महाप्रसाद होईल. सोमवार दिनांक, 9 सकाळी आसावरी महिला भजनी मंडळ, पंढरपूर यांचे भजन तसेच गिरीश कुलकर्णी सोलापूर यांचे भक्ती संगीत दुपारी प्रवचन ह. भ. प .सुनिल महाराज अकलूज आणि रात्री किर्तन ह. भ. प .संदिप मांडके यांचे होईल आणि महाप्रसाद दिला जाईल. मंगळवार दिनांक,10 रोजी सकाळी सुगम संगीत श्री. अमित कुलकर्णी बार्शी तसेच बासरीवादन नंदकुमार डिंगरे, शिवचरित्र जाणता राजा कुमार साईराज मोहन घाटपांडे जुन्नर यांचे होईल आणि प्रवचन ह. भ. प .संध्या संतोष पाठक सांगली यांचे होईल तसेच रात्रीचे किर्तन ह. भ. प .भक्त राघवेंद्र देशपांडे यांचे होऊन महाप्रसाद होईल. बुधवार दिनांक,11 सकाळचे भजन राम कृष्ण महिला भजनी मंडळ फलटण यांचे होईल सुगम संगीत श्री. रामचंद्र नवले व संतोष कवडे करकंब यांचे होईल प्रवचन ह. भ. प. एकनाथ महाराज पाटील मेढेकर सर यांचे होईल वसंत पूजा समस्त ब्रह्मवृंद नीरा नरसिंहपूर यांचे होईल आणि रात्री चे किर्तन ह. भ. प. शुभांगी पाठक मांडवे यांचे कीर्तन होऊन महाप्रसाद होईल. गुरुवार दिनांक 12 गुरुवार सकाळचे भजन श्री भक्त प्रल्हाद संगीत विद्यालय निरा नरसिंहपुर तसेच शारदा स्वरांजली भजनी मंडळ इंदापूर नागपुरे यांचे होईल दुपारचे प्रवचन ह-भ-प .श्री. पद्मनाभ व्यास उस्मानाबाद यांचे होईल आणि रात्रीचे कीर्तन हे ह. भ. प .सौ राजश्री राजेंद्र गंगाखेडकर नांदेड यांचे होऊन महाप्रसाद होईल. शुक्रवार दिनांक 13 सकाळी भक्ती संगीत सौ निता कुलकर्णी आणि सौरभी व निलेश आराध्य यांचे होईल सुगम संगीत दुपारी सौ सुकन्या अ. दंडवते यांचे होईल दुपारी प्रवचन हे ह .भ. प. तुकाराम नारायण विप्र योगीसुत यांचे होईल आणि रात्रीचे कीर्तन हे ह .भ. प .सुप्रिया सचिन पवार वालचंदनगर यांचे होऊन महाप्रसाद होईल. शनिवार दिनांक 14 श्री लक्ष्मी नरसिंह जयंती उत्सव या दिवशी सकाळी भक्ती संगीत हे श्री समर्थ भक्त अजित गोसावी इंदापूर यांचे होईल तसेच सकाळी भक्ती संगीत सौ शुभांगी अरगडे रमेश रावतेकर व सहकारी यांचे होईल. दुपारी प्रवचन ह. भ. प .मोहन बुवा रामदासी यांचे होईल, आणि सायंकाळी नरसिंह जयंती किर्तन ह. भ. प .विलास गरवारे सर सिद्धेश्वर कुरवली यांचे होऊन महाप्रसाद होईल. रविवार दिनांक 15 रात्री वाजत गाजत छबिना श्रींची पालखी व मिरवणूक होईल. तसेच सोमवार दिनांक 16 सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत काल्याचे किर्तन ह .भ. प. श्री .अंकुश रणखांबे महाराज यांचे होऊन दुपारी 4 वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार महाराष्ट्रातील नामांकित पैलवानची उपस्थिती कुस्त्याच्या आखाड्यामध्ये उपस्थित राहणार. इनाम रुपये 100 पासून ते 51 हजार रुपये पर्यंतच्या नामांकित कुस्त्या होणार आसल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार. मा.सरपंच नरहारी काळे,सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, माजी सरपंच संतोष मोरे, माजी सरपंच आण्णा काळे, मा. उपसरपंच विलास ताटे, माजी सरपंच हनुमंत काळे, प्रसिद्ध उद्योगपती विजय सरवदे, माजी सरपंच जगदीश सुतार, ग्रामपंचायत सदस्य आनंद काकडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन सरवदे, माजी सरपंच हानुमंत काळे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, ,सचिन कदम ,डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, आरुण क्षीरसागर, पप्पू गोसावी, प्रशांत बांधले पाटील. तुकाराम भंडलकर ,प्रभाकर जगताप, नाथाजी मोहिते, किशोर मोहिते , ,नितीन भोसले ,उमेश कोळी, बापू जगदाळे, राजेंद्र निंबाळकर, आतुल हावळे, सिद्धेश्वर काळे, डॉक्टर अरुण वैद्य,राजेंद्र देशमुख, नाना देशमुख, राजू बळवंतराव, दत्ता कोळी, बाबुराव गव्हाणे, अक्षय गोडसे, आमोल गोडसे, शिवाजी गोडसे , आण्णासाहेब घोडके, गौतम सरवदे आशोक सरवदे, घनश्याम सरवदे तसेच सर्व नीरा नरसिंपूर येथील भाविक भक्त आणि ग्रामस्थ .