
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
सातपुड्यातील विविध गावांमध्ये यात्रोत्सवांचा हंगाम सुरू असून यात आदीवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.दरवर्षी अक्षयतृतीया पासून सुरू होणाऱ्या भांग्रापाणी ता. अक्कलकुवा येथील यात्रोत्सवाला आज पासून प्रारंभ होणार आहे.
भांग्रापाणी येथील संतोषी माता मंदिरात यात्रोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत .१९८१ साली छत्रसिंग रुपसिंग वसावे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.या भागातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संतोषी मातेचा यात्रोत्सव दर वर्षी अक्षयतृतीयापासून सुरू होतो. यंदाही ३ तारखेपासून विविध पूजा या ठिकाणी चालू असून दि.६ आणि ७ मे रोजी मुख्य यात्रोत्सवाला सुरवात होणार आहेत. तत्पूर्वी अनवरसिंग वसावे व शेवंताबाई वसावे यांच्या हस्ते अक्षयतृतीयाच्या दिवशी मुख्य पूजा करण्यात आली. असून पंचमीच्या दिवशी पूजन होऊन यात्रेला सुरवात होईल.येथे दर्शनासाठी तालुक्यातील विवीध भागातील आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने या यात्रोत्सवात सहभागी होतात.दि.६ पासून सुरु होणाऱ्या यात्रोत्सवा वाचा समारोप ९ रोजी करण्यात येणार आहे.या निमित्ताने सोंगाड्यापार्टी सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.१९९७ पासून मंदिर आणि यात्रोत्सवाचे आयोजन जय संतोषी माँ बहुउद्देशीय संस्था यांच्या कडून करण्यात येते.
वडफळी ता. अक्कलकुवा येथील यात्रोत्सवा च्या समारोप आणि तळोदा येथील पाटी यात्रेचाही समारोपा नंतर भांग्रापाणी येथील संतोषी माता यात्रोत्सवाला सुरवात होते.
या यात्रोत्सवात विविध खाद्यपदार्थ व गृहपयोगी साहित्यांची खरेदी विक्री होते.वडफळी येथील यात्रोत्सवात गुजरात राज्यातील भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी लावली जाते.व महादेव मंदिर येऊन भाविक आपले नवस फेडत असतात.त्याच प्राकारची गर्दी व नवस फेडण्याची प्रथा आणि गावांतील लोकांचे आरोग्य व सुखा या साठी यात्रोत्सवात पूजा करण्यात येते.