
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
महाराष्ट्र राज्यात ६ मे २०२२ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व साजरे करण्यात येत आहे.
मंठा येथे सर्व समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारी सकाळी ठीक १० वाजता छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा ठेवून छ.शाहू महाराजांना व डॉ.बाबासाहेबांना जेष्ठ पत्रकार पंडित बोराडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यांत आला. उपस्थितांनी शाहू महाराजांना वंदन करून नियोजित वेळेचे भान ठेवत काटेकोर १०० सेकंदाची स्तब्धता पाळून कृतज्ञतापर आदरांजली अर्पण केली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, मा. नगरसेवक अरूणभाऊ वाघमारे, प्रा.राघव गायकवाड, प्रा.सोनाजी कामिटे, कार्यकर्ते शरदराव मोरे, नाना वाघमारे, गंगाराम गवळी, अशोक अवचार, रमेश आवारे,भिमराव वाघ जय भिम सेना जिल्हा उपाध्यक्ष जालना, बी.के.प्रधान, विलास मोरे, सतीश खंदारे, राजू खंदारे, जी.डी.जाधव, रंगनाथ बापू वटाणे, अॅड. अनिल मोरे,पिराजी पवळे,राज खनपटे, यांची आवर्जून उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महेन्द्र टेकुळे यांनी केले.