
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे – शिरूर मध्ये डोक्याला पिस्तूल लावून पतीसह खलास करण्याची धमकी देऊन मजूर महिलेवर बलात्कार केेला. श्रीगोंदे मधील एका साखर कारखान्याचा संचालक व शिरूर तालुक्यातील बडा नेता याच्याविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रीनिवास बाबूराव घाटगे (रा. इनामगाव, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचा संचालक असलेला घाडगे हा शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा पदाधिकारी आहे. बलात्कार झालेल्या मजूर महिलेने अत्याचाराविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली होती. त्यांच्या आदेशावरून शिरूर पोलिसांनी घाटगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. इनामगाव येथील एका शाळेनजीकच्या बांधकामावर हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला जिल्हा परिषद शाळेजवळील एका पडक्या खोलीत काम करीत असताना घाटगेने तेथे जावून तिच्यावर बलात्कार केला.