
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पुणे: संस्कार प्रतिष्ठानचा १७ वा वर्धापन दिन चिंचवड येथे मोठ्या उत्साहाने व विविध पुरस्काराने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने भास्कर सिनारे समाजरत्न,खुशी हासे क्रीडारत्न, भरत गुंजाळ कामगाररत्न, डॉ.कृष्ण घोगरे डॉक्टररत्न,डॉ.पुडलिंक बरकले डॉक्टररत्न,डॉ संजय कढणे डॉक्टररत्न,डॉ बाळासाहेब वाकचौरे समाजरत्न, सुरेख क्षिरसागर संस्काररत्न, साक्षी कड कोरोना यौद्धा पुरस्कार, सचिन पवार डॉक्टररत्न, आरोही हिवरकर कलारत्न, विजयकुमार थिटे कलारत्न, सविता भांगर आदर्श सरपंच पुरस्कार, प्रीती चुडसमा संस्काररत्न,तेहसीन शेख समाजरत्न,राम भालेराव समाजरत्न,अनिल सोळंके उद्योगरत्न, वैशाली मोहिते उद्योगरत्न, बाळासाहेब साळुंके आदर्श कामगार पुरस्कार, कांता राठोड आदर्श कामगार पुरस्कार इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाटा मोटर्सचे मृत्युंजय माने जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब मेमाने कामगार कल्याण केंद्राच्या प्रमुख प्रदीप बोरसे अभिनेत्री रुपाली पाथरे अभिनेत्री आरोही हिवरकर संस्कार प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मोहन गायकवाड सचिव भरत शिंदे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.