
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: पिंपरीतील तरुण प्राचीन बौद्ध लेण्यांचा अभ्यास दौरा करण्यासाठी मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील श्यामगढ रेल्वे स्थानकापासून सुमारे तेवीस किलोमीटर अंतरावर धमणार या गावी पोहोचले आहेत. दरम्यान धमणार येथे एकूण शंभर बौद्ध लेण्यांचा समूह असून पुरातत्त्व खात्याने मोजक्याच लेण्यांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे.अशी माहिती लेणीसंवर्धक मनोज गजभार यांनी अभ्यास दौऱ्यातून दिली आहे.दरम्यान या लेणी समुहा सोबत या ठिकाणी धर्मराजेश्वर नावाचे मंदिर कोरले गेले आहे. धर्मराजेश्वर हे मंदिर नवव्या शतकातील असून येथे शेव हिंदू लेणी आहे .धमणार येथील प्राचीन बौद्ध लेण्या इ. सन पाचव्या ते सातव्या शतकामध्ये कोरल्या गेल्या असून शैल्य स्थापित आहेत. अजिंठा वेरूळ लेण्या प्रमाणे ह्या लेण्या देखील भव्य शिल्पकलेने नटलेल्या आहेत. या लेण्यातील दगड ठिसूळ असल्याकारणाने लेण्यांची नासधूस मोठ्या प्रमाणात झाली आहे. या लेण्यामध्ये चैत्य स्तूप, विहार, भिक्खू निवास, सोबतच बुद्धांचे शिल्प कोरले आहे. या ठिकाणी छोटे-मोठे कोरीव स्तुप बनवण्यात आले आहेत. या लेण्या अजिंठा वेरूळ लेण्या प्रमाणे चित्र आणि शिल्पांनी अलंकृत केल्या आहेत.या शिल्पांमध्ये प्रामुख्याने ध्यान मुद्रा, अभयमुद्रा, महापरिनिर्वाण अशा विविध प्रकारचे बुद्ध शिल्प आहेत. या बुद्ध लेण्यांचा समूह निसर्गाच्या कुशीत असून लोकवस्तीपासून काही अंतरावर लांब आहे. या बुद्ध लेण्यांची माहिती लवकरच आपल्याला वेगवेगळ्या या माध्यमातून पाहायला मिळणार आहे या अभ्यास दौऱ्या दरम्यान लेणी संवर्धक सागर कांबळे, लेणी संवर्धक मनोज गजभार, धम्मकमल (गुजरात), प्रज्वल जाठे यांच्यासह अनेक लेणी अभ्यासक व समर्थक या दौऱ्यात उपस्थित होते.