
दैनिक चालु वार्ता वाडा प्रतिनिधी-मनिषा भालेराव
वाड्यातील विष्णू नगर मध्ये जिजाऊ संस्थेमार्फत टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरु केला (दि ९ /५/२०२२)रोजी ४ च्या सुमारास पाण्याचे टॅंकर आणून विष्णू नगर मधील रहिवासी यांना पाणीपुरवठा करण्यात आला त्याप्रसंगी जिजाऊ संस्थेच्या वतीने अनेक नगरात पाणी पुरवठा केला जाईल असे देखील सांगितले पाणी टंचाई ग्रस्त भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने पाणीटंचाईच्या समस्येवर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून उतारा मिळाला आहे पाणीपुरवठा सुरू झाल्याने रोजच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होताया वेळी जिजाऊ संस्थेच्या अध्यक्षा हेमांगी ताई पाटील, जिजाऊ संस्थेचे महेंद्र ठाकरे, जिजाऊ संस्थेचे कैलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
विष्णू नगरमधील रहिवासी हो महिलांनी देखील जिजाऊ संस्थेचे आभार मानले