
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
खुमगावं, दहिगाव(नांदुरा) :-दि.१० तालुक्यातील खुमगाव आणि दहिगाव या दोन्ही गावात मोठ्या प्रमाणात दारू आणि वरली व्यवसाय सुरू करण्यात आला आहे, या अवैध धंद्यावर पोलीस यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,असे दिसून येत आहे,खुमगाव आणि दहीगाव या गावामध्ये हजारोच्या संख्येने संख्या असल्यामुळे या अवैध धंद्याची वाढ फार मोठ्या प्रमाणात झाली आहे, या अवैध धंद्यामुळे तरुण पिढीला व्यसन लागत आहे, काही नागरिकांचे घर उद्ध्वस्त झाले,
अगोदरच्या काळात काही प्रमाणात अवैध धंदे सुरू होते,पण आता हा व्यवसाय वार्ड वार्डात व्यवसाय सुरू झाल्यासारखा दिसून येत आहे, याचे कारण काय आहे पोलिस यंत्रणा कमी पडत आहे काय? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडत आहे, काही दिवसापूर्वी खुमगाव आणि दहिगाव गावातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या पण काही फरक पडला नाही, ज्यांनी तक्रार केली त्याला अवैध धंदेवाले धमकी देतात, आणि पुढे कोणी जात नाही एवढेच नाही, तर महिलांचा मोर्चा निघाला होता तहसील कार्यालय नांदुरा व पोलीस स्टेशन नांदुरा तरीपण सुद्धा काही फरक पडला सारखा दिसून येत नाही असे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल खंत दिसून येत आहे,