
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -रामेश्वर केरे
जिल्हातील गवळी शिवरा येथील सुप्रसिध्द भारुडकार ह.भ.प जालिंदर महाराज केरे यांचा सोलापूर जिल्ह्यातील बावी ता.माढा येथे दि.१५ रविवारी सायंकाळी ६ वाजता पारंपरिक सोंगी भारुडाचा कार्यक्रम प्रसिद्ध उद्योजक मनोज कदम, अभिजित मोरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.जालिंदर महाराज केरे यांनी आपली भारुडकला सातासमुद्रापार केली असून भारुडातून अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्रभर सुरु आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सोलापूर जिल्हात सोंगी भारुड होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे