
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुद्ध जयंती निमित्त भव्य मंगल मैत्री फेरी
नांदुरा :-दि.१६.अज्ञानी असणे हे एखाद्या बैलाप्रमाणे आहे. जे फक्त आकाराने मोठे आहेत. परंतु, त्यांच्या बुद्धिमत्तेत कोणतीही वाढ झालेली नसते. आपण आपल्या समस्येवर उपाय शोधू शकलो, तर काळजी करण्याची काय गरज आहे आणि समस्येवर उपायच नसेल तर काळजी करून काही फायदा नाही. या जगात आपण एकटे आलो आणि एकटेच जाणार आहोत. त्यामुळे आपला मार्ग आपल्यालाच तयार करायचा आहे. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे, असं तथागत गौतम बुद्ध यांचा संदेश सर्व ज्ञात आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त बुद्ध जयंती उत्सव समिती च्या वतीने आज दि.१६ मे रोजी नांदुरा शहरातून भव्य मंगल मैत्री फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या फेरी ची सुरुवात वार्ड क्रमांक १४ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बुद्ध विहारात त्रिशरण पंचशील ग्रहण करून झाली.बुद्धम शरणम गच्छामि! धम्मम शरणम गच्छामि!! संघम शरणम गच्छामि!!! या निनादात शहराच्या प्रमुख मार्गाने येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करून पुढे मोतीपुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार अर्पण करून भीमनगर येथील बुद्ध विहारातील बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करून शरणत्यय गाथा घेऊन समारोप करण्यात आला.या मंगल मैत्री फेरीचे आयोजन नियोजन बुद्ध जयंती उसत्व समितीचे अध्यक्ष प्रवीण गुळचळ, उपाध्यक्ष धम्मपाल वाकोडे,सचिव प्रकाश बरडे,सहसचिव सनी तेलंग,सुशील इंगळे,कोषाध्यक्ष रोहित तायडे यांनी केले.मंगल रैली मध्ये शहरासह तालुक्यातील बहुसंख्य बौद्ध उपासक,उपसिका सहभागी झाले होते.