
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार शहरात 2 दिवसापासून एरटेलचे नेटवर्क गायब होत आहे. 16 मे रोजी रात्री उशिरापर्यंत एरटेल चे नेटवर्क नव्हते आणि पुन्हा आज सकाळपासूनच नेटवर्क नाही त्यामुळे शहरातील कोणतीही ऑनलाईन सुविधा उपलब्ध होत नाहीत.नागरिक दिवसभर खूपच परेशान झाले आहेत .आता असे वाटत आहे की जशी महावितरण कंपनीने लोडशेडींग ठेवले होते तसेच एअरटेल चे कंपनीने लोडशेडींग ठेवले आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
एअरटेल कंपनीच्या नावे कंधार शहरामध्ये नागरिकांच्या वतीने आक्रोश केला जात आहे. शहरात व ग्रामीण भागात सुद्धा ओरड होत आहे जर एअरटेल चे असेच राहिले तर नागरिकांकडून उपोषण करण्यात येईल असे समजत आहे.