
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश नामदेव माने
जालना, दि. 17 – बहिणीला ट्युशनला सोडून घरी परतत असताना रस्त्याच्या मध्यभागी चालणार्या युवकास जाब विचारला म्हणून आठ जणांनी त्याच्यावर हल्ला चढवली. लाकडी दांडा, लोखंडी रॉड व चाकुचे वार करण्यात आल्याने यात एक जण जखमी झाला. ही घटना जालना शहरातील उडवी चौकात घडली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिसरात शांततेचे आवाहन करत चोख बंदोबस्त ठेवला. याप्रकरणी जखमी युवकाच्या तक्रारीवरून एसबी जालना पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण लखनलाल भगत (21 वर्षे, रा. गवळीपुरा मराठा बिल्डींग जवळ जालना) याने पोलिसांना सांगितलेली माहिती अशी की, दि. 16.05.2022 रोजी संध्याकाळी 05.00 वाजेच्या सुमारास बहीण श्वेता भगत हिला ट्युशन साठी मोटारसायकलने सोडून घराकडे परतत होतो.
दरम्यान उडपी चौक येथील सुरज मेडिकल समोर नुमान हा रस्त्याच्या मध्यभागात चालत असल्याने करण लखनलाल भगत याने त्यास रस्त्याच्याकडेने चाल असे म्हणाला. तू गाडी सिधा चला असे तो करण लखनलाल भगत यास म्हणाला. तेव्हा करण लखनलाल भगत याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी करून त्यास बोलत असताना तेथे फरदीन फेरोज खान हा लाकडी दांडा घेवून आला व त्याने करण लखनलाल भगत याच्या डोक्याला मानेवर वार केले.
त्यावेळी तेथे फरदीन याचा भाऊ आदील याने लोखंडी रॉडने मारून जखमी केले. नंतर साहील खान हा तेथे आला असता त्याने चाकूने मारले असता तो वार चुकवल्याने उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मार लागला. तेथे फेरोज रशीद खान बाजुला उभा राहुन शिवीगाळ करीत होता. त्यावेळी आणखी तेथे रहेमान खान, कलीम शेख अफ्ताब शेख हे आले व त्यांचे हातातील लाठी काठ्यांनी उजव्या पायाच्या पोटरी, मांडीवर, गुडघ्याचे मागे, छातीवर, चेहऱ्यावर, दोन्ही खांद्यावर मुक्का मार दिला.
त्यावेळी तेथे करण लखनलाल भगत याच्या भावाच्या मित्रांनी सोडवासोडवी करून भाऊ सुनील भगत यास फोन करून माहीती दिली असता तो तेथे लगेच आला. नंतर त्याने करण लखनलाल भगत यास जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी एसबी जालना पोलिस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात