
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- दि.१६/०५/२०२२ रोजी जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री राजेंद्र गाडेकर,अँड.राजु शिंदे, प्रा. भगवान माने,प्रा.भास्कर चादर, श्री चंद्रकांत भोंडवे, इंजि.नितिन गोपन,प्रा.नामदेव चांगण प्रा. चंद्रकांत चाळक या निवड समितीच्या एक मताने राजे यशवंतराव होळकर राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कारासाठी श्री संजय हाळनोर यांची निवड करण्यात आली.
श्री संजय हाळनोर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशासह नेपाळ पर्यंत शहरा-शहरातील ठरावीक ड्रायव्हर लोकांचे व्हाटसअप ग्रुप बनवून त्यांच्याच आडीआडचणीच्या वेळेला त्यांनाच मदतीला पाठवण्याची एक नाविन्य पूर्ण संकल्पना रूजू केली.परिणाम स्वरूप प्रवासातील प्रवाशांना पण त्याचा फायदा मीळू लागला.आपघात असो किंवा गाड़ी ब्रेक डाउन असो की इतर कुठल्याही मदतीची गरज असो त्या वेळेच्या गरजे नुसार गरजूंना चालक वर्गा कडून २४ तास व तात्काळ मदती मीळू लागल्या.
सदरच्या मदती मुळे मुख्यतः ड्रायव्हर व हेल्पर यांना बाहेर गावी, बाहेर राज्यात ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या त्या मधे अमुलाग्र बदल होऊन ड्रायव्हर समाज बर्याच प्रमाणावर सुखावला आहे.
श्री संजय हाळनोर यांनी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेची स्थापना करूण चालक वर्गाला समाज सेवेची एक नवी दिशा दाखवून दिली आहे.त्याला अनुसरूण हाच चालक वर्ग रक्तदान शिबिर,गरजेच्या वेळी गरजूंना अन्नदान,आपघाती किॆवा मयत चालकांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत,चोरीला गेलेली वाहने, हरवलेले व्यक्ति,मुले शोधून देणे,बेवारस प्रेताची ओळख पटवून देणे आसे एक ना अनेक उपक्रम राबवून नेहमीच दुर्लक्षीत राहिलेला हा ड्रायव्हर समाज आपल्या कृतीने समाजाचे लक्ष्य वेधुन घेत आहे.
वाहन चालकांना संघठीत करतांना श्री संजय हाळनोर यांना सुरूवातीच्या काळा मधे खुप परिश्रम घ्यावे लागले,आर्थिक,मानशिक आशा अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले. त्यांच्या याच परिश्रमाचे फलीत मणुन त्यांना जय मल्हार प्रतिष्ठान बीड यांनी राजे यशवंत रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
श्री संजय हाळनोर यांचे बीड शहरात आगमन होताच जय संघर्ष संस्थेचे बीड जि.अध्यक्ष श्री राजेंद्र भोसले यांनी शाल, श्रिफळ व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.त्यावेळी बीड ग्रुपचे दादा शिंदे,बाळू वडमारे, समीर पठाण,मन्सुर शेख,नबी शेख, कलंदर शेखआणि दिवंश डोळस तसेच वडवणी ता.उपाध्यक्ष श्री नवनाथ कांबळे,रमेश हूलगुंडे, किसन दुरगूडे, बाळू वैद्य, राधेश्याम शिंदे व ओमकार शिंदे मांजरसुंभा सर्कल अध्यक्ष श्री गोकुळ दराडे,चैतु खाडे दिनेश घोळवे, चंद्रकांत मुंढे, गणेश जोगदंड,गणेश लोमटे,बाळू वायभट,बाळू दराडे,विजय दराडे, आष्टी ता.अध्यक्ष अवजड विभाग श्री सागर पडूळे,अक्षय चितळे, प्रवीण अनभुले, तुषार जाधव, सुजित साबळे व रूषी अनभुले, बीड शहर अध्यक्ष अवजड विभाग श्री सोमीनाथ कुदीवन या सर्वांनी अध्यक्ष संजय हाळनोर यांचे स्वागत केले.
गेवराई ता.अध्यक्ष श्री नारायण सरक अवजड विभाग यांनी वरील सर्वांना सर्वाना चहा नाष्टा करवून रवाना केले.
औरंगाबाद शहरातील संस्थेचे पदाधिकारी श्री अब्बासभाई पठाण,रविंद्र सुरडकर,श्री लक्ष्मण सोनवणे,शिवाभाऊ त्रिंबके,श्री सुनिल आप्पा,श्री रमेश कोलते आणि सचिन थोरात यांनी वरील सर्वांचे आभार माणले.