
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी -परमेश्वर वाव्हळ
पिंपरी:कार्ला लेणी येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने सामुदायिक महा बुद्धवंदना घेण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८५ व्या बुद्ध जयंती निमित्त कार्ला बुद्ध लेणी मावळ येथे भिक्कू संघ सर्व धार्मिक संघटना, विविध सामाजिक संस्था सर्व लेणी संवर्धक यांच्या सहकार्याने सुमारे ५००० पैक्षाही बौद्ध बांधवांनी या सामुदायिक महा बुद्धवंदनात सह भाग घेतला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस बौद्ध भिक्खूंना त्रिशरण पंचशील देण्याची याचना केल्यानंतर पूज्य भंन्ते यांच्या संघाच्या वतीने महा बुद्ध वंदना घेण्यात आली व समता सैनिक दलाच्या वतीने कार्ला बुद्ध लेणीस मानवंदना देण्यात आली.धम्मदेसना झाल्यानंतर या माहा बुद्ध वंदनेस उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले. यानंतर सर्वांनी मुख्य चैत्यगृहात जाऊन स्तूपास वंदन केले आणि या बुद्ध लेणी ची माहिती सांगितली. मावळ तालुक्यातील स्थानिक बांधवांनी महा बुद्ध वंदनेसाठी आलेल्या सर्वांची पाण्याची व लिंबू सरबत आणि ५ ते ६ हजार पुरणपोळ्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली.
या कार्यक्रमाचे नियोजन लेणी संवर्धक गेली सहा महिन्यांपासून करत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मकरंद सर व त्यांच्या संस्थेचे आभार मानले. बुद्धवासी विनोद शिरसाठ युवा मंच यांचा देखील या कार्यक्रमास सहभाग लाभला.