
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
————-
शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहरराव धोंडे यांनी केले निवडीचे घोषना.
——————–
देगलूर: शहरातील सामाजिक,राजकीय क्षेञासह विविध क्षेञात अतिशय सक्रीय सहभाग घेत अविरतपणे सर्वसामान्यांसाठी सदैव तत्परतेने काम करणारे व्यक्तीमत्व म्हणून रुपेश पाटील भोकसखेडकर यांची सर्वञ ओळख,त्यातच गेल्या अनेक वर्षापासून काॅग्रेस पक्षात सतत सक्रीय कार्यकर्ता म्हणूनही त्यांची पक्षातंर्गत सर्वदूर ओळख.देगलूर शहरासह तालूक्यातील ग्रामीण भागातील विरशैव लिंगायत समाजाचा एक आक्रमक युवा नेतृत्व याचीच दखल घेत शिवा संघटनेचे राष्टीय अध्यक्ष तथा संस्थापक मा.श्री.मनोहरराव धोंडे यांनी देगलूर मध्ये आयोजित जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात रुपेश पाटील भोकसखेडकर यांची समाजाप्रती चालू असलेल्या कौतुकास्पद कामाची वर्णन करत त्यांची जाहिर सभेत शिवा संघटनेच्या देगलूर शहरअध्य पदी या महत्वपुर्ण पदाची जबाबदारी सोपवली असल्याचे घोषणा केले. यावेळी सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांचे आशिर्वादही रुपेश पाटील यांना लाभले यावेळी शिवा संघटनेचे सर्व कर्मचारी व नांदेड जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्याण या निवडीचे अभिनंदन देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेशजी अंतापूरकर, जि.प.माजी सदस्या मीनल ताई खतगावकर,शिवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे,नांदेड जिल्हा काॅग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे,जि.प.स्विकृत सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर यांच्यासह आदीनी केले आहेत. दरम्याण शिवा संघटनेच्या शहरअध्यपदी रुपेश पाटील तळमळीने काम करतील व येणार्या काळात शिवा संघटनेचे
संघटन शहरात अधिकच भक्कम करतील असे प्रतिक्रीया देत अनेक पदाधिकारी समाज बांधवांचा रुपेश पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..