
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
राष्ट्रवादी पक्ष संघटनेशी एकनिष्ठ राहून कार्य बघून आज “युवक तालुका अध्यक्ष- विक्रमगड” या पदी श्री.भरत भोये यांना नियुक्ती करण्यात आली,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षासाठी आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळापर्यंत पक्ष बळकटीसाठी नवनियुक्त पदाधिकारी अथकपणे प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी आमदार श्री.सुनील भुसारा यांनी व्यक्त केला आहे.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे उप.मुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार मा आमदार सुनिल भाऊ भुसारा साहेब, पालघर जिल्हाध्यक्ष, तसेच मा कमळाकर दादा धूम – विक्रमगड विधानसभा अध्यक्ष ई पदाधिकारी उपस्थित होते.
भरत भोये यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे आभार मानले.