
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
दि.२०. दोन दिवसा पूर्वी महाराष्ट्रातील मिडियावर एक बातमी चालविल्या गेली की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू…!!
बातमी मध्ये तथ्य नाही असा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत प्रवक्ता मा. सिद्धार्थ मोकळे यांच्या कडून केला गेला आणि ही खोडसाळ बातमी आहे असेही आहे…!!
कॉग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर अद्यापही कळले नाही का…??
कॉग्रेस पक्षाचे प्रमुख राजीव गांधी यांनी केंद्रीय मंत्री पदाची दिलेली अॉफर बाळासाहेब आंबेडकर यांनी ३० वर्षापूर्वी नाकारलेली आहे…!!
माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे प्रमुख व्ही. पी. सिंह यांनी १९८९ मध्ये दिलेली केंद्रीय मंत्री पदाची अॉफर सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेली आहे…!!
गेली ४१ वर्षे सक्रिय राजकारणात असलेल्या अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी सत्ताधारी पक्षांनी संसदेत जाण्यासाठी अकोला लोकसभेची जागा तुमच्या साठी सोडतो आमच्या सोबतं युती करा असा प्रस्ताव असतोच मात्र स्वतः च्या खासदारकी साठीचा प्रस्ताव मंजूर करुन वंचितांची लढाई अर्ध्यावर सोडणारा स्वार्थी नेता होण्यापेक्षा सत्तेतील लाभाचा त्याग करून गेली ४१ वर्षे अॅड. बाळासाहेब आंबेडकर बहूजन समुहाच्या हक्क अधिकारासाठी त्यागाचं आणि स्वाभिमानी राजकारण करीत आहेत …!!
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस पक्षाकडे युती ची बोलणी करतांना २माळी, २ धनगर, २ मुस्लिम, २ छोटे ओबीसी, २ आदिवासी, २ आंबेडकरवादी अशा १२जागा ज्या कॉग्रेस पक्षाने तीन तीन वेळा हरल्या आहेत त्या मागितल्या होत्या हेही कॉग्रेस पक्ष विसरला आहे का…?? कुणाच्या भिकेवर राजकारण करायचे नाही हे ठणकावून सांगताना, भारिप बहूजन महासंघाचे घोषवाक्य आहे…!!
” भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.”
हे कॉग्रेस पक्षाला कळत नसेल तर मग कॉग्रेस पक्षाला बालिश म्हणू नये तर काय…??
स्वतः साठी सत्तेतील मंत्रीपद किंवा राज्यसभा,लोकसभा खासदारकी या मोहाच्या पलिकडे जाऊन वंचितांच्या सत्तेसाठी स्वाभिमानी लढा लढून स्वतः च्या ताकदीवर सत्तेत जाण्याचा प्रयोग करणारे अॅड बाळासाहेब आंबेडकर एका राज्यसभेच्या जागेसाठी कुण्या राजकीय पक्षाच्या पाठिमागे फरफटत जाणार नाहीत हे कॉग्रेस पक्षाने अद्यापही समजून घेतले नसेल तर मग कॉग्रेस पक्षाला बालिश म्हणू नये तर काय..??
वंचित बहुजन आघाडी सोबतं युतीसाठी राजगृहाच्या पाय-या झिजविणा-या कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी असा खोडसाळपणा करणे थांबविले पाहिजे…!!
कुणाच्या भिकेवर राजकारण न करता, स्वाभिमानी राजकारण करणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे घेणारे नसुन देणारे आहेत हेही कॉग्रेस पक्षाने समजून घेतले पाहिजे…!!
वंचित समुहातील १० आमदार, तीन मंत्री, एक महामंडळाचा अध्यक्ष आणि नऊ जिल्हा परिषद अध्यक्ष बनविणा-या स्वाभिमानी नेत्या बद्दल खोडसाळ प्रचार करुन संपलेल्या कॉग्रेस पक्षाने आपले बालिशपणं थांबवावे असे वाटते.