दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
कंधार ते तेलुर मार्गे बाचोटी -बारूळ राज्यमार्ग क्रमांक 56 व सोनखेड— बारूळ राज्यमार्गावरील मंगलसांगवी– बामणी (दोन किलोमीटर )हा रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहतुकीसाठी योग्य नाही .यासाठी हे दोन्ही रस्त्यांचे दुरुस्तीचे काम येत्या आठ दिवसात सुरुवात करू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण नांदेडचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी दिनांक 19 रोजी जनआंदोलन कृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करताना दिले .रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून अनेक वेळा विनंती अर्ज देऊनही उपयोग झाला नाही .दिनांक 30 एप्रिल रोजी बारूळ कॅम्प तालुका कंधार येथे जनआंदोलन कृती समितीतर्फे चार तासाचे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते .त्यामुळे या कामाला गती आली. कार्यकारी अभियंता श्री तोंदले व सहाय्यक वनसंरक्षक श्री ठाकूर यांच्याशी जनआंदोलन कृती समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. बामण (पाटी) मंगळसांगवी दोन किलोमीटर रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करून घ्यावा वनविभागाने दुरुस्तीच्या च्या परवानगी ऐवजी डांबरी करण्याच्या कामास तात्काळ मंजुरी द्यावी. अशी मागणी करण्यात आली .होऊ घातलेले काम दर्जेदार व्हावे तसेच कंधार येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालय बंद प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. जन आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष बाबुराव बस्वदे, एस पी जाधव ,शिवसांब देशमुख, देविदास पाटील कदम आदी उपस्थित होते
