दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : टाटा समूहाद्वारे चालवलेले एअर इंडियाचे A320neo विमान काही तांत्रिक बिघाडामुळे 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान बदलल्यानंतर प्रवाशांना बेंगळुरू येथे त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यात आलं.
रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या 27 मिनिटांत विमानतळावर परतले. एअर इंडियाच्या A320neo विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. टाटा समूह संचालित विमान कंपनीचे हे विमान टेक ऑफ केल्यानंतर मुंबई विमानतळावर परतले, कारण त्यातील एक इंजिन तांत्रिक समस्येमुळे हवेत थांबले होते. झोपेतच सून-मुलाची हत्या करणारा वृद्ध बाप बोलतो, ”साहेब, कारण विचारू नका…” एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेंगळुरूला जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना गुरुवारी दुसऱ्या विमानात पाठवण्यात आलं आहे.
हवाई वाहतूक नियामक महासंचालक नागरी विमान वाहतूक या घटनेची चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एअर इंडियाच्या A320neo विमानांमध्ये CFM लीप इंजिन बसवलेले आहेत. या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याला विचारले असता ते म्हणाले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते, आमच्या विमानाचे वैमानिक आणि इतर कर्मचारी अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आणि तज्ञ आहेत. या प्रकरणात आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल पथकांनी त्वरित या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
