
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-नामदेव तौर
परतूर : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅसचे दरवाढ तत्काळ मागे घ्यावे; तसेच वाढत्या बेरोजगारी समस्या सोडवावी, या मागणीसाठी येथे परतूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा शहरातील शिवाजीनगर येथून निघाला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे, माजी नगराध्यक्ष विनायक काळे, रमेश सोळंके, अंकुश तेलगड, अखिल काजी, विजय राखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारी महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ उपाय-योजना कराव्यात; अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवदेनात
देण्यात आला आहे. निवेदनावर ओंकार काटे, अकील पठाण, योगेश बरकुले, अंकुश शिंदे, मोहन बाण, सुभाष खंडागळे, शाकेर पठाण, सत्तार मास्टर, अफरोज सौदागर, मजास अन्सारी, योगेश मुळे, इलियास शेख, हरी मानवतकर, वैजनाथ गवळी, सोनाजी गाडेकर, दीपक स्वप्ने, गजू मस्के, केशव काळदाते, कोंडिबा कांदे, संजय चव्हाण, गोपीनाथ सोळंके, वसंत जगताप, शिवाजी राष्ट्रवादी करपे, प्रदीप कादे, उत्तरेश्वर शेळके इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत