दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
दि.२२. : सर्वात स्वस्त प्रवासापैकी रेल्वेचा प्रवास मानला जातो. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्व रेल्वे प्रवाशांनी तुडुंब भरलेले असतात.रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसते. तशीच गर्दी स्थानकावरही आपल्याला पाहायला मिळते. इंटरनेटप्रमाणे रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरले आहे.
स्वातंत्र्य मिळूनही आजही आपला देश ब्रिटिश राजवटीला पैसे देतो. याचं कारण आहे ते म्हणजे अमरावतीतील ‘ शकुंतला रेल्वे मार्ग ‘ . हा रेल्वेमार्ग आजही ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे भारत ब्रिटिश राजवटीला कर देतो. ‘ क्लिक निक्सन ‘ या ब्रिटिश कंपनीने १९०३ मध्ये शकुंतला रेल्वे मार्ग बनवण्याचे काम सुरू केले होते.
त्यानंतर तेरा वर्षांनंतर म्हणजे १९१६ मध्ये हा मार्ग बनवण्याचे काम पूर्ण झाले होते. या कंपनीचे आजचे नाव म्हणजे ‘ सेंट्रल प्रोव्हीनेंस रेल्वे कंपनी’ . कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या अमरावतीहून मुंबईला कापूस नेण्यासाठी ब्रिटिशांनी या ठिकाणी रेल्वे मार्ग तयार केला. तेव्हा रेल्वे तयार करण्याचे काम फक्त खाजगी कंपन्या करत असत. ब्रिटिश कंपनीने या मार्गाचे काम पूर्ण केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या ६० वर्षात या मार्गाची देखील झाली नाही. दरवर्षी कर देऊनही ब्रिटिश कंपनी या मार्गाची देखभाल केली नाही. हजारो प्रवासी या मार्गावरील रेल्वेचा वापर करत असतात.भारतीय रेल्वेला या रेल्वे मार्गासाठी दरवर्षी १ कोटी २० लाख रुपये मोजावे लागतात.
