दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी-विशाल खुणे
असंघटित कामगारांचे आरोग्य शिबीर त्यांच्या झोपडपट्टीत , बांधकामाच्या ठिकाणी ,व मजूर अड्ड्यावर जाऊन घेण्यात आले. पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला नदीकाठी असलेल्या बांधकाम मजुरांच्या राहत्या घरी जाऊन व सांगवीतील मजूर अड्ड्यावर ही घेण्यात आले , जवळपास शंभर मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
बांधकाम मजूर आपल्या पोटासाठी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून व परराज्यातून आलेला आहे ,आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे, म्हणून त्यांना काही गंभीर आजारा विषयी माहीत नसते, यासाठी “आपले आरोग्य, आपली जबाबदारी” या अंतर्गत आरोग्य शिबीर घेतल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.
सक्षम संस्थेच्या प्रोजेक्ट मँनेजर डॉ स्नेहल महुकर म्हणाल्या कि एच. आय. व्ही. सारखा दुर्जर आजार मजूरांना होऊ नये. म्हणून मजुरांना आजाराची माहिती दिली जाते, आणि जर ए.आय.व्ही सारखा आजार झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना घरी जाऊन माहिती देऊन ,औषध ऊपचार केले जातात, गेल्या वीस वर्षांपासून आमची संस्था वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिराचे आयोजन, व प्रयोजन करते.असंघटीत कामगारांना या आरोग्य शिबिराचा निश्चित फायदा होईल असे त्या म्हणाल्या.
शहर महीला अध्यक्षा संजना करंजावणे म्हणाल्या गोरगरीब मजूर स्वतः च्या आरोग्य कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे वेगवेगळ्या दुर्जर आजारांना समोरे जावे लागते, आरोग्य शिबिरामुळे निश्चित त्यांना फायदा होईल.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, शहर महिला अध्यक्षा संजना करांजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, गुणवंत कामगार काळूराम लांडगे,प्रोजेक्ट मँनेजर स्नेहल महुलकर ,डॉ. पुजा माने,गायत्री भिंगारे आरोग्य कर्मचारी,गजानन धाराशिवकर , आप्पाजी चव्हाण, प्रकाश बंडेवार, श्रेयस जोगदंड, जालींदर दाते, पुष्कर जोगदंड,हनुमंत पंडित सा.का राजू राजापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
