दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका-
आवाळपूर इथे आज गोवारी समाज स्मारक भूमी पूजन करण्यात आले
गोवारी समाज म्हटलं की २३ नोव्हेंबर १९९४ हा दिवस महाराष्ट्राला ज्ञात आहे,
आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात आलेल्या मोर्चा वर अमानूष पणे लाठी हल्ला झाला आणि ११४ गोवारी बांधव शहिद झाले,
त्यानंतर या जमातिचे लोकांसमोर आले अनूभवाने ज्वलंत प्रश्न अधिरेखित झाले,
गोवारी समाजांचा इतिहास लोकसंख्या, चालीरिती,सन उत्सव, विवाह पद्धती , लोकसाहित्य,बोलि भाषा यांचा उल्लेख करण्यात आला,
गोवारी हे गोंड वंशातील आहे त्यांच्या लोकवस्ती विदर्भात आहे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा ठिकाणी गोवारी समाजाची लोकसंख्या आहे,
या प्रसंगी आवाळपूर गावची प्रथम नागरिक प्रियंका ताई दिवे सरपंच मॅडम बाळकृष्ण काकडे उपसरपंच बिंट्टू भाऊ दिवे ग्रामपंचायत सदस्य विकास भाऊ दिवे ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई दूधकोर, हूसेन मूर्खे , दिलीप भाऊ दूधकोर आणि मोठ्या संख्येने गोवारी समाज उपस्थित होते
