दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
(आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनिवास मोरे यांचा विशेष लेख)
नांदेड दक्षिण मतदार संघाचे भाग्य विधाते जनतेचे पाठीराखे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार मोहन अण्णा हंबर्डे होत आज दि.२३ हे रोजी त्यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
नांदेड दक्षिण मतदार संघ हा म्हणजे काँग्रेस चा बालेकिल्ला असुन नांदेड जिल्ह्याचे भाग्य विधाते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना मानणारा हा मतदारसंघ आहे. यात बहुतांश भाग हा नांदेड मनपा क्षेत्रातील येतो तर सोनखेड, वाजेगाव, बळीरामपूर आदी भाग नांदेड ग्रामीण चा येतो नांदेड दक्षिण मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे ना.अशोकराव चव्हाण यांचे हात मजबूत करणारा आहे पण २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा गड ढासळला होता.
शिवसेनेचा उमेदवार येथे काठावर निवडणून आला होता पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ना. अशोकराव चव्हाण यांनी मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वर विश्वास टाकून त्यांना काँग्रेस पक्षाच्या त्यांना नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली.
या संधीचे सोने करुन मोहन अण्णा हंबर्डे यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रितपणे करून धर्मनिरपेक्षता पाळून प्रत्येकांशी संवाद साधला विश्वास जिंकला व नांदेड दक्षिण मधून दणदणीत विजय मिळवला.
नांदेड दक्षिण चे आमदार झाल्या वर त्यांनी आमदारकीचे वारे आपल्या डोक्यात शिरू न देता जमिनीवरच राहुन गोरगरीब शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीय व्यापारी सर्वाचे प्रश्न सोडवाणे त्यांच्या मदतीला धावून जाणे त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देणे शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे, अतिवृष्टी ने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यावर त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करणे ते मिळवून देणे.
नांदेड दक्षीण मतदार संघात रस्ते,वीज पाणी यांची व्यवस्था करणे विष्णूपूरीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वेळेवर पाळी सोडणे यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देणे.
एखाद्या शेतकऱ्यांचा शार्ट सर्किटमुळे ऊस जळाल्यास त्यांच्या मदतीला धावून जाणे थेट बांधावर जाऊन पाहणी करणे प्रशासनाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आदेशित करणे तसेच निराधाराचे प्रश्न सोडविणे , सामान्य माणसाणे फोन केल्यावर तो तात्काळ उचलणे त्याचे म्हणणे ऐकूण घेणे त्याचा प्रश्न सोडविणे अनेक नागरिकांना आजारपणात त्यांना चांगला उपचार मिळवून देणे अनेकांना मुंबई येथील नामांकित खाजगी दवाखान्यात शासकीय योजनातून उपचार करणे आदी व्यक्तीगत कामाबरोबरच नांदेड दक्षीण मतदार संघात दळणवळणाची सोय व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे रस्ते,पुल आदी मंजूर करणे कामे चालू आहेत यात सोनखेड – शेवडी-पेनूर रस्त्याचे काम व पुल मंजूर करून तो पुर्ण करणे, सोनखेड – वाहेगाव ,बेटसांगवी रस्ता मंजूर करणे यासह नुकतेच २० मार्च रोजी आ. ४३.५८ कोटी रूपयांच्या रस्ते व पुलाच्या कामाचे उद्घाटन व शुभारंभ केला आहे ,यासह मतदार संघातील अनेक गावात नांदेड मनपा क्षेत्रात सिडको हडको परिसरात अनेक कामे मंजूर करुन नांदेड दक्षिण मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणे चालू आहे तसेच कारेगाव, पिंपळगाव येवला ,सोनखेड सह मतदार संघात अनेक कोट्यवधी रुपयांची कामे आ.मोहण अण्णा हंबर्डे यांनी केले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात ही अनेक गोरगरीबांना शेकडो क्विंटल अन्न धान्य मोफत वाटप करणे त्यांच्या आरोग्याची काळजी करणे अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत करणे बाहेर गावचे अनेक जणांना पास उपलब्ध करून देऊन गावाकडे सुरक्षीत पोहचविणे आदी महत्वपूर्ण कामे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले आहेत.
ते आमदार झाल्यानंतर त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक गावात दौरा मारला आहे तिथे विविध विकास कामे सुरू केले आहेत.
आता पर्यंतच्या सर्व आमदारांचे विक्रम त्यांनी मोडले आहेत जनतेच्या सुखा दुःखात धावुन जाणारा आपल्या मतदार संघाचा विकास करणारा विकास पुरुष नांदेड दक्षीण मतदार संघाचा भाग्य विधाते म्हणून आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांची ओळख निर्माण झाली असून ते नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लाडके आमदार असुन आज दिनांक २३ मे रोजी नांदेड दक्षिण मतदार संघाचे भाग्य विधाते आ. मोहन अण्णा हंबर्डे यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ईश्वर त्यांना चांगले निरोगी आरोग्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.
श्रीनिवास मोरे
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य
सोनखेड
मो.९४२०७०९४२०
