दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहरातील देवणेवाडी येथे कॉन्ट्रॅक्टर दताभाऊ वसमतकर यांच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला असुन या कार्यक्रमात हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
लोहा शहरातील देवणेवाडी येथे एकाच ठिकाणी प्रसिद्ध मारोती मंदिर, महादेव मंदिर असून हे देवस्थान ज्वलंत व नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे येथे अनेक भाविक भक्त भक्त दर्शनाला येतात व अनेक भाविक भक्त हे भंडारा करुन महा प्रसाद करतात यात लोहयाचे भूमीपुत्र तथा प्रसिद्ध कन्ट्राकटर दत्ताभाऊ वसमतकर यांच्या वतीने आज दिनांक २२ मे रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी त्यांच्या वतीने स्वादिष्ट व रुचकर महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.
तेव्हा या कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी घेतला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताभाऊ वसमतकर, गजानन पाटील चव्हाण, पत्रकार संजय कहाळेकर यांच्या सहीत मित्र मंडळीनी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
