
दैनिक चालु वार्ता दौंड प्रतिनिधी -अरुण भोई
दौंड.उजनी धरणाचे पाणी हे दौंड तालुक्यातील पूर्व भागाच्या शेतीसाठी आणि पाणी पिण्यासाठी एक वरदान आहे .उजनी धरण १०० टक्के भरल्यावर फुगवटा खोरवडी पर्यंत येतो. तसेच हा फुगवटा एप्रिल मे पर्यंत ओसरत नाही. त्यामुळे गावांना खानवटे पासून खोरवडी पर्यंत पाणी कमी पडणे ही शक्यता फार थोडी असते.उजनीचा फुगवटा उन्हाळ्यात एप्रिल आणि मे मध्ये ओसरला की दौंडच्या पूर्व भागातील गावांना पाण्याची कमतरता भासते शेतकऱ्यांना पाहण्यासाठी मग कसरत करावी लागते . उजनी धरणाचा फुगवटा ओसरला की आजूबाजूच्या विहीर आणि बोअरला पाणी कमी होते आणि पाऊस लांबला तर जून महिन्यात शेतकऱ्यांची पिके जळून जातात .पाऊस कमी झाला तर दोन ते तीन वर्षातून एकदा तरी शेतकऱ्यांवर अशी वेळ येते.
लाकडी निंबोडी योजनेमध्ये उजनी धरणातील पाणी हे ६००० एचपी विद्युत पंपाने उपासा होणार आहे. त्यामुळे इंदापूरचे आठ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून तर दौंड तालुक्यातील जमिनी ओसाड होणार आहे. यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना जानेवारी मध्ये च मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे .अगोदरच बँकेचा डोक्यावर कर्जाचा बोजा आहे .लाकडी निबोडी योजना झाली तर भविष्यात दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्या शिवाय राहणार नाही .
या योजनेमुळे दौंड या पूर्व भागातील शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात येणार आहे .
त्यामुळे उजनी धरणातील पाणी लाकडी निंबोडी योजने साठी नेण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षजन आंदोलन पुकरणार आहे.
दौंडच्या पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांनी या जन आंदोलनात सहभागी व्हावे ही विनंती केली आहे. रमेश शितोळे – देशमुख अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष दौंड तालुका