
दैनिक चालू वार्ता
दैनिक चालु वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – जामगाव रघुनाथ नगर येथील गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चाके आता शेतकऱ्यांनसाठी फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २० मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे टेंडर उघडले आणि जय हिंद शुगर सोलापूर यांच्या नावे २५ वर्षांसाठी भाडे तत्त्वाने गंगापूर साखर कारखाना देण्यात आला आहे.
आतापर्यंत बँकेकडून निविदा काढण्यात आल्या तरीदेखील कोणीही कारखाना घेण्यास तयार नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. कारखाना सुरू करावा, यासाठी उद्योजक, राजकीय मंडळींना साकडे घातले होते. मात्र, चौथ्यांदा जय हिंद शुगरने टेंडर घेऊन कारखाना सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. २२०० टन गाळप क्षमता
असलेला ३५ हजार लि. डिस्लरी शुगरचे मालक माने व देशमुख क्षमता १५ की अंतरात भरघोस यांनी कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन उसाचे पीक समृद्धतेने नटलेला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू हा कारखाना राजकारण्यांच्या पुसण्याचे काम केल्याने शेतकऱ्यांनी राजकिय ग्रहणामुळे बंद होता परंतु जय हिंद शुगरने भाडेतत्त्वावर घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जय हिंद शुगर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना आजवर केलेली मदत तसेच त्याच्या विषयी मराठवाड्यातील शेतकर्यांनी दाखवलेला विश्वास यामुळे गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतकर्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
कारखाना सुरू होतोय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. परंतु तालुक्यातील स्थानिक मंडळींनी यात राजकारण करू नये कारण सध्याचे संचालक मंडळ तसेच विरोधी माजी संचालक मंडळ व स्थानिक लोकप्रतिनिधी कारखाना सुरू करण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे कारखाना सुरू होई पर्यंत त्यांनी तटस्थपणे उभे राहून नवनिर्वाचित कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ही भले होईल व स्थानिक युवकाना देखील रोजगार मिळेल. जर कोणी काडी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांनी कामगार नागरिकांनी चांगला समाचार घ्यावा
-इंजि.महेश गुजर, ऊस उत्पादक शेतकरी कृती समिती
जय हिंद शुगरने कारखाना भाडे तत्वाने घेऊन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले आहे.कारखान्याची मशिनरी जुनी जरी असली तरी चांगल्या प्रतीची आहे. त्यामुळे किरकोळ दुरूस्ती, काही नविन यंत्रणा बसवल्यास पुढील हंगामात सुरुवातीला कारखाना होईल. सन्मानाने बोलावण्यास किवा गरज भासल्यास जुने कामगार सर्वतोपरी मदत करतील परंतु त्यांना किवा स्थानिकांना रोजगार मिळावा ही अपेक्षा.
–विठ्ठल कुंजर (कामगार गंगापूर कारखाना)