
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
धडगाव ता.24 अनेक दिवांपासून लालपरीचा प्रतीक्षेत असलेल्या कात्री आणि खुंटामोडी परिसरातील नागिकांची प्रतीक्षा आज संपली २२ तारखे पासून या भागातील नागरिकांसाठी धुळे ते खुंटामोडी वाया धुळे -दोंडाईचा नंदुरबार-कुकरमुंडा अक्कलकुवा- मोलगी खुंटामोडी मुक्कामी बस सेवा सुरु करण्यात आली आहे त्यामुळे एस महामंडळाचे कौतुक होत आहे.
धुळे खुंटामोडी बस सेवेमुळे धडगांव मोलगी परिसरातील लोकांसाठी तसेच नर्मदा काठावरील डेब्रामाड, पलासखोब्रा,वेलखेडी,पौला,मुखुडी,मोजो,काठी,मोजरा,सोनभानोली, हुंडा रोषमाळ या दूर्गम भागातील गावातील लोकांना धुळ्यापर्यंतचा प्रवास सुखाचा होणार होणार आहे कारण त्यांना नंदुरबार धुळे प्रवास करण्यासाठी अनेक ठिकाणी वाहने बदलावी लागत होती.तसेच मोलगी हे व्यापाराचे मोठे ठिकाण असल्याने व्यापाऱ्यांना आपल्या मालाची ने आण करण्यासाठी खूप सोयीचे होणार आहे मोलगीहून नंदुरबार गाडीची ही अनेक दिवसापासून असलेली मागणी या बस सेवेने पुरी होणार आहे.
मोलगी परिसरातील सुरगस,पिंपळखुंटा,वडफळी मुक्काम गाडीची ही अनेक दिवसा पासून मागणी होत आहे ती सुरू झाल्यास अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा परिसर पूर्ण होईल,धुळे खुंटामोडी बस सेवेने आनंदीत झालेल्या खुंटामोडी गावातील लोकांनी बस सेवेच्या पहिल्या दिवशी बस चालक आणि वाहक यांची पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि नागरिकांना अशीच सेवा देत राहावी अशी आशा व्यक्त केली खुंटामोडी गावाचे सरपंच श्री गेमलसिंग वळवी,दिलवरसिंग वळवी,सुकलाल वळवी,विनोद वळवी, प्रविण वळवी,मोगा राठोड,विश्वास पाडवी, शिवाजी नाईक, इत्यादींनी स्वागत केले. त्यामुळे परिसातील नागरिकांना या बस सेवेचा खूप फायदा होणार आहे.
धुळे खुंटामोडी बस सेवा मार्ग हा धुळे दोंडाईचा नंदुरबार कुकरमुंडा अक्कलकुवा मोलगी खुंटामोडी असा असेल मुक्कामी आलेली बस सकाळी ६ वाजता खुंटामोडी हून सुटेल त्यामुळे या बस सेवेचा लाभ परिसरातील नागरिक हे खाजगी वाहनातील वाजवी भाडे देण्यापेक्षा कमी भाड्यात सुखरूप प्रवासाचा आनंद घेतील अशी आशा व्यक्त होत आहे.