
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
“योग करा, निरोगी रहा” या म्हणीप्रमाणे मनुष्याचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व सर्व रोगाचे समुळ निर्मूलन अथवा शरीर संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी गेली कित्येक दिवसांपासून नियमित व अखंड पणे लोहा येथे पतंजली परिवाराकडून “योगा” चे आयोजन केले जाते. त्यातच लोहा येथे ११ दिवसीय भव्य नि;शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पतंजली योग परिवार लोहा यांच्या वतीने ११ दिवशीय भव्य निःशुल्क योग शिबिर दिनांक २६ मे २०२२ ते ०५ जुन २०२२ दरम्यान सकाळी ०५.०० ते ०७.०० या वेळेत शहरातील बिडवई नगर,कैलास स्मृती निवाससमोरील कै.विश्वनाथराव नळगे विद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात उच्च रक्तदाब (ब्लडप्रेशर), मधुमेह (शुगर), वातरोग, थायरॉईड,मोटापा,मान -पाट-कंबरदुखी,आदी रोगांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.सदरील शिबिरात मार्गदर्शक मान्यवर अनिल अमृतवार(राज्य प्रभारी), सुरेश लंगडापुरे (जिल्हा प्रभारी), उर्मिला साजने, काळे व जिल्ह्यातील मान्यवरांचे योग शिबिरात मार्गदर्शन लाभणार आहे.
सदरील ११दिवशीय भव्य निःशुल्क योग शिबिरास येतांना सादकाने आसनासाठी स्वतःचे चादर सतरंजी आणणे अनिवार्य आहे.सादकाने ढिले-ढाले कपडे वापरावे,वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असून महिलांनी शक्यतो सलवार कमीज वापरावा,साडी वापरत असेल तर सोबत सलवार वापरावा.तसेच शिबिरास येताना आनशापोटी यावे. जमल्यास सोबत पाण्याची बॉटल व चपला साठी कापडी बॅग वापरावी व जास्तीत जास्त संख्येने सादकाने उपस्थित राहण्याचे आवाहन पतंजली योग परिवार लोहा चे दिपक भातलवंडे, विश्वंभर वाडेवाले, मोहन पवार,डॉ. सविता घंटे आदींनी केले आहे.