
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
बुलडाणा -दि.२५. बाजार समितीत भुईमुग शेंगांची आवक वाढली आहे. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेंगांची जास्त आवक होत आहे. भुईमुग शेंगांचीदररोज सात हजार क्विंटल खरेदी होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमुग काढण्याची लगबग सुरू आहे.त्यामुळे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भुईमूग शेगांची आवक वाढली आहे.
येत्या खरीप हंगामाच्या पेरणी साठी अनेक शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने भुईमुग शेंग जास्त वेळ घरात ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी ताबडतोब भुईमुग शेगांची विक्री करतात. खामगाव बाजार समिती विदर्भात सर्वात मोठी बाजार समिती समजली जाते. शिवाय जिल्ह्याच्या तुलनेत खामगाव तालुक्यात भुईमुगाचे उत्पन्नही जास्त घेतले जाते.
त्यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुग शेगांची आवक चांगल्या प्रकारे आहे. दररोज सात हजार क्विंटल पोत्यांची आवक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कडून देण्यात आली आहे.