
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
औरंगाबाद शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या सुप्रितकौर उर्फ कशिस या चिमुरडीची भरदिवसा निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून निकाली काढावे. या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांकडे सुपूर्द करण्यात आले. सदर घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अश्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून यापुढे राज्यातील कुठल्याही निष्पाप मुलींना नाहक प्राण गमवावे लागणार नाहीत. आज जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून या प्रकरणात विशेषत्वाने लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी मनपा सभापती सौ. अपर्णा नेरळकर, नगरसेविका सौ.प्रकाशकौरताई खालसा, सौ.मंगलाताई निमकर, सौ.रेखाताई चव्हाण, सौ.मंगलाताई धुळेकर, यांच्यासह अन्य महिला लोकप्रतिनिधी, व आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते