
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
हिंदोळा :- लोहा तालुक्यातील हिंदोळा/करमाळा/पिंपळदरी/कापसी (बु.) परिसर येथे श्री. ह. भ. प.मथुसूदन महाराज यांच्या वडिलांची पुण्यतिथी दिनांक ३०/०५/२०२२ सोमवारी गुरू गणेश गीरी महाराज गुरू माधव गीरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्संग समागम कार्यक्रम आयोजित केला आहे.यावेळेस विषय आहे, पितृसेवेचे तीन आयाम श्रावण,पुंडलिक, परशुराम या विषयावर तीन तास चिंतन होणार आहे. यामध्ये वेदशास्त्रसंपन्न श्री.यज्ञेश्वर महाराज शास्त्री लाठीकर ,श्री.निजानंद महाराज पालमकर, श्री. ह. भ. प. चंद्रकांत महाराज लाठकर, श्री. ह. भ. प. बाबू महाराज काकांडीकर श्री. दत्ता महाराज वळसंगवाडीकर, श्री. भास्कर महाराज कामारीकर, श्री. माधव महाराज इंदूरकर, श्री. व्यंकट महाराज माळकौठेकर, श्री. प्रभाकर महाराज पिंपळगावकर, श्री. ह. भ. प. वासुदेव महाराज कोलंबीकर , श्री. भिमाशंकर महाराज कापसीकर, श्री. पंढरी महाराज पळसगावकर, श्री. भगवान महाराज शेलगावकर, श्री. कानगुले महाराज नांदेड, सुत्रसंचालन श्री. बालाजी महाराज गुडेवार या कार्यक्रमामध्ये गुणीजन गायक वादक विव्दज्जन मंडळी येऊन आपआपली सेवा देणार आहेत तरी सर्व भाविकांना विनम्र प्रार्थना आहे, आपण सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होऊन सत्संग समागम कार्यक्रमाचा लाभ घ्यावे असे भागवताचार्य श्री.ह.भ.प.मधुसूदन महाराज भक्त आश्रम हिंदोळा/ करमाळा /पिंपळदरी/कापसी परीसर हे स्थळ यांनी कळविले आहे.