
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी धाड सर्कल प्रतिनिधी -सलमान नसीम अत्तार
मातूभूमी फाउंडेशन तर्फे चांडोळ येथे जनजागृती अभियान तर्फ HIVकेम्प घेण्यात आले.
HIVची लागण हे AIDSचं सगळ्यात मोठं कारण आहे. या विषाणूची बाधा झालेले एकूण 3.7 कोटी लोक जगभरात आहे. त्यापैकी 70% लोक एकट्या आफ्रिका खंडात आहे.
2017मध्ये 18 लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. गेल्या वर्षी जगभरात 10 लाख लोकांचा HIVशी निगडित रोगांमुळे मृत्यू झाला आहे.
हा रोग 1980च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. HIVची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक
माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतंय.
चांडोळ मध्ये घेण्यात आलेल्या HIVकेम्प मध्ये. सहभागी पाटील सर. देशपांडे मॅडम. शारिक सर यांनी तपासणी केली. तसेच चांडोळ ग्रामपंचायत सदस्य कलीम अत्तार यांनी सहकार्य केले.