
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
भोस्कर पिता पुत्राचा व नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने सत्कार.
प्रत्येक माणसाला मुर्त्युला सामोरे जावे लागते मुर्त्यु हे अटळ वास्तव आहे हे सर्वजन जिवंत पनी समस्यांना तोंड देणार्यांचे शेवट तरी गोड व्हावा या उद्देशाने लोहा शहरातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या स्मशानभूमीला जुना लोहा येथे १२गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जागा मालक सोमनाथदादा भोस्कर हानमंत भोसकर या बंधुचा व बंडु भोसकर या पिता पुत्राचा व लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा लोहा शहरातील तमाम वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या शाल पुष्पहार घालून व फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
लोहा शहरातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या स्मशानभूमीचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित होता समाज बांधवांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली होती परंतु त्याकडे कोणत्याही न.पा.तील सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नव्हते २०१८ च्या लोहा न.पा. च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देऊन सर्व सुविधा सह स्मशानभूमी बांधण्यात येईल असे वचननाम्यात जाहीर केले होते आता त्यांची प्रत्यक्ष अमंलबजावणी झाली असून लोहा न.पा. च्या वतीने जुना लोहा स्मशान भूमी लगत वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या स्मशानभूमीसाठी १२ गुंठे जमिन भोस्कर यांची घेण्यात आली व भोस्कर बंधुची व पिता पुत्रांनी ही सामाजिक बांधिलकी जोपासत वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या स्मशानभूमीसाठी जागा दिली त्यामुळे सोमनाथदादा भोसकर हानंमत भोस्कर या दोन्ही बंधुचा व बंडु भोसकर या पिता पुत्राचा व नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित केशवराव शेटे दत्ता शेटे बाबाराव शेटे काशीनाथ शेटे मलकार्जुन कहाळेकर मलकुआप्पा शेटे माधव वसमतकर बाळासाहेब कतुरे गजानन स्वामी दिलीप काहाळेकर बाळु गुरुजी ईश्वर कांजले गुंनवत शेटे राजु शेटे पीटु वडे सचिन कोठे विश्वनाथ शेटे व जुन्या लोहा शहरातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते