
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. देवानंद जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेवून आत्महत्या केल्याचे आज दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. जाजू हे गत २० ते २५ वर्षांपासून नांदेडच्या सिडको परिसरात वैद्यकीय सेवा देत होते याबाबत प्राथमिक माहिती अशी की, डॉ. देवानंद ज यांचे हॉस्पिटल आणि निवास्थान एकाच ठिकाणी Open in app त्याच्या पत्नी देखील डॉक्टर असून मुलींच्या शिक्षणासाठी त्या बाहेर गावी असतात. आज दुपारी जाजू यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाहणी नंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला.दरम्यान, डॉ. जाजू यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, झोपेच्या गोळ्या सेवन करून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्ववंशी यांनी दिली. डॉ. देवानंद जाजू हे वैद्यकीय व्यवसायासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर्स आघाडीचे पदाधिकारी होते. रूग्णसेवा, धार्मिक,राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योग होते.