
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा:दि.२६ कोणाच्याही आयुष्यात पत्नी किंवा पतीचा विरह कायम येऊ नये. सर्व दानपत्र होईपर्यंत निरोगी आनंद मय जगावे, ही भावना अगदी सर्वांच्याच मनात असते. परंतु हा नियतीचाखेळ कधी कुणा कळला ? महानायिका अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यात देखील त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी पती निधन पावले ची घटना घडली. वयाच्या २१ नंतर पती विना त्यांनी सक्षम पणे राज्यकारभार सांभाळला. अगदी तशाच प्रकारचा प्रसंग ॲड. प्रियंका देशमुख यांचे बाबतीत घडला. ज्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्ती जगातून निरोप घेतो त्याच व्यक्तीला ते दुःख समजत असते. पण ही दुःखद जीवाची आत्यंतिक घालमेल करणारी परिस्थिती असतानाही जिजाऊंचे कार्य आणि त्यांचा वैचारिक वारसा जोपासण्याचा दृढनिश्चय यशस्वी प्रयत्न प्रियंका देशमुख यांनी केला. ॲड. शैलेश देशमुख यांचा वैचारिक दृष्टिकोन, आठवणी आणि त्यांच्यातील सकारात्मका, स्वआचरणराने जपण्याचे काम ॲड. प्रियंका देशमुख करत आहे. वकिली करून देखील समर्थ पतसंस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. मुलांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष देत आहेत. कुटुंबांना समाजाशी नाळ जोडून आहेत.ॲड. शैलेश देशमुख यांचे कार्य पुढे नेणार असे विश्वास मय वक्तव्य देखील वेळोवेळी व्यक्त केले आहे. अन तशीच खंबीर वाटचाल सुरू आहे.जिजाऊ ताराराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महिलाच कुटुंब समाज आणि देश घडवत असतात. अशाच प्रकारे कार्य करणाऱ्या ॲड.प्रियंका देशमुख यांच्या हस्ते ‘पुर्णांगिनी’ पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.