
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मलकापूर :दि:२६.महिलांचे कार्य आता चूल व मूल एवढ्यावरच राहिलेले नसून २१ व्या शतकात महिलांनी विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय कार्य केलेले आहे.तर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादनाचे ब्रँडिंग करण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले. दोन टक्के रक्कम शहर समूह घालताना देण्यात येते. यावेळी वेद माता महिला बचत गट, आसावरी महिला बचत गट, आकांशा महिला बचत गट ,यांना या कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी मलकापूर नगर पंचायत चे मुख्य लिपिक माधव कुटे, शहर अभियान व्यवस्थापक दीपक खोंडे, समूह संघटक मीना चोपडे, प्रेरणा वस्तीस तर संघ, रणरागिनी वस्तीस तर संघ,शहरस्तर संघाच्या पदाधिकारी व महिला बचत गटाच्या सदस्या यावेळी उपस्थित होत्या. दीनदयाळ अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बचत गटांना कर्जाचे वितरण करण्यात येते. ती प्रामुख्याने स्थापन केलेली असून महिलांनी उद्योगांमध्ये काम करताय आहे तसेच त्यांचा उदरनिर्वाह चालावा याकरिताही अभियान राबविण्यात येतात.त्या अनुषंगाने शहरातील तीन महिला बचत गटांना प्रत्येकी चार लाख रुपयांची विविध लघु उद्योगा करिता सुमारे चार लाखाचे कर्जाचे वाटप व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.