
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :दि.२६.जिगाव प्रकल्प बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसनाचा संदर्भात मान. आ. राजेश एकडे यांनी नांदुरा येथे आढावा बैठक घेतली. त्यांचे फलित म्हणून नांदुरा नगर परिषद हॉल मध्ये जिगाव प्रकल्पातील अतिक्रमणधारकांना मोबदला मिळाला.जिगाव प्रकल्प अंतर्गत अतिक्रमित घरे यांचा मोबदला मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेंच या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांच्या सहकार्याने चेक वाटप करण्यात आले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम आमदार महोदयांनी केल्याबद्दल अतिक्रमण धारकांचे चेहऱ्यावर नवचैतन्य पहावयास मिळाले.तसेच सर्व अतिक्रमण धारकांनी माननीय आमदार राजेश एकडे यांचे या केलेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले. गावाच्या अतिक्रमणधारकांना चेक वाटप करण्यात आले .यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, जिल्हा पुनर्वसन समिती सदस्य पुरुषोत्तम झा ल्टे, आकाश वतपाळ सरपंच टाकळी वतपाळ, पातोंडा गावचे सरपंच राजू पाटील, नारायण झाल्टे, राम पांडव, सुनील पाटील माजी सरपंच येरळी, गणेश काटे सरपंच दादगाव, चोपडे ,निखाडे ,भरणे, बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप देशमुख किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष यांनी केले. आभार प्रदर्शन आकाश वतपाळ सरपंच यांनी केले.