
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि- मारोती कदम
झी युवा संगित सम्राट फेम अजय देहाडे यांच्यासह सुप्रसिद्ध गायक हजेरी लावणार!
नांदेड दक्षिण मतदार संघातील सोनखेड येथे आज दिनांक 27 मे 2022 रोजी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या ‘क्रांतीसूर्याची सावली’ या कार्यक्रमामध्ये, क्रांतीसुरांची संगीतमय मानवंदना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलिपभाऊ कंदकुर्ते हे राहणार असून नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी राम शेट्टी, तेजस माळवदकर, सत्येंद्र आऊलवार, राजू एडके, अशोक गोडबोले, विनोद रापतवार, चंद्रसेन देशमुख, साहेबराव नरवाडे, भुजंग गोडबोले, राम बोरगांवकर, विशाल भोसले, शुद्धोधन लोणे, वावळे आदींची उपस्थिती राहणार आहे.
स्वागताध्यक्ष बाळूभाऊ सातोरे हे उपस्थित राहणार आहेत.
‘बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच’ आयोजित, शाहीर विनोद गोडबोले प्रस्तुत ‘क्रांती सूर्याची सावली’ त्यागमूर्ती माता रमाई महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून तसेच बुद्धजयंती व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘क्रांती सूर्याची सावली’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते ‘झी’ युवा संगीत सम्राट फेम- अजय देहाडे, दूरदर्शन सूरसागर फेम- पियुष वासनिक, सुप्रसिद्ध गायक निवेदक हर्षद कांबळे, सुप्रसिद्ध गायक निवेदक चेतन चोपडे, सुप्रसिद्ध गायक लोककलावंत विनोद गोडबोले हे क्रांती सुरांची मानवंदना देणार आहेत.
मानवंदनेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष राहुल खिल्लारे, उपाध्यक्ष आनंद गोडबोले, तुकाराम खिल्लारे, सचिव नंदकुमार ससाने, सहसचिव बाळासाहेब खिल्लारे, कोषाध्यक्ष आनंद धुतराज, सहकोषाध्यक्ष मोतीराम धुतराज, सल्लागार राम लोखंडे सर ,विष्णू गोडबोले, संभाजी खिल्लारे सर, लोभाजी गवारे, कैलाश गोडबोले, श्याम वाघमारे, नवनाथ शेळके, अमोल खिल्लारे, प्रज्ञाधर ढवळे, सुनील धुतराज, गणेश धुतराज, प्रकाश खिल्लारे,राजेश भोरगे, सचिन खिल्लारे, मिलिंद धुतराज,पप्पु सुर्यवंशी, महेश सावकार, मिलिंद गोडबोले, जनक गोडबोले, नागेश गोडबोले, गजानन गच्चे, सुदर्शन गोडबोले यांनी केले आहे.