
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा:दि.२६.राजकारण व समाजकारणात नेते होण्याची हौस कैक जणांना असते मात्र काही हौशी मंडळींना त्याची बाधा होऊन जाते जसे की दोन हाणा पन नेता म्हणा. नेते होणे सोपे नाही , त्याकरीता कतृत्वाच्या कसोटीवर स्वत:ला सिध्द करावे लागते. अपघाताने एखादे पद मिळाले खुर्चीचा सन्मान (ओढुन ताणुन ) घेतला म्हणजे कुणी नेता होत नाही तसे कुणी मानतही नाही. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी काहींची गत असते. दुस-याच्या कतृत्वात आपलं नेतृत्व घुसवणारे महाभाग कमी नाहीत. सोशल मिडीयाच्या जमान्यात यांचे फोटोसेशन खास असते. एखाद्या नटाला लाजवेल असे यांचे आॅडीशन विथ अनकंडीशन अभिनय असतो. धावपळीत घामाघुम दिसावा म्हणुन तोंडावर पाणी मारुन धाप लागल्यासारखे बोलणे हे तर लाजवाब. आपल्या आसपास परीसरात कुढलेही कतृत्व नाही संघटनेत नेतृत्व नाही मग तुम्ही स्वतला नेता कसे समजता ? अशा स्वयंघोषीत नेत्यांना ना संघटन कौशल्य माहीत असते ना संघटनेची ध्येयधोरणे. गर्दी दिसली की यांच्या आतील नेतेपणाला धुमारे फुटतात. चार-दोन गोष्टींची वारंवारीता करत अल्पज्ञान वाटणारे नेते मात्र मोक्याच्या वेळेस तोंडघशी पडतात. बरे जर काही बाबी ज्ञात नाही तर कशाला आव आणायचा.
बिच्छु का मंत्र पता नही चला बिल मे हात डालने।
अशा हौशी नेत्यांना मिरवण्याची फार हौस. ओढुन ताणुन प्रसंगी हट्ट धरुन नेतेपणाची खाज भागवुन घेतात. खरे तर असे नेते ना लपवायच्या कामाचे ना दाखवायच्या. याला पी हळद हो गोरी असेही म्हटले तरी तो वावगं नाही. असे स्वयंघोषीत नेते संघटनेत जागा आवरुन घेतात मात्र फायदा शुन्य. कोणताही सामाजीक किंवा राजकीय कार्यक्रम असला की या नेत्यास स्वतचा फोटो व नांव शोधण्याचा भारी छंद. ते नसले की याचे मन खट्टु होते. कारण नेतेपणाची खाज काही केल्या जात नाही मग याला सांग त्याचा वशिला लाव काही करा पन मला प्रमोट करा असे हे निलाजरे गजरे घेवुर वरातीत पहील्या रांगेत हमखास दिसतात. सक्रीयतेच्या व योग्यतेच्या परीमंडळात न बसणा-या व्यक्तीमत्वास नेता म्हणणे हा एक उपहासात्मक प्रयोग होय. शाब्दीक अलंकारात स्वतला सजवणारे व कृतीत खोटा सिक्का असणारे नेते यांची किव येते.
असो….. संघटनेत कामातुन सिध्द करणारे कायम कार्यकर्ताच राहतो. तो ना कधी नेता होतो ना कधी तसे भासवतो. बरं अशांची जाहीरात करणारे कोणत्या दबावात काम करतात हे सुध्दा कळत नाही.
अशा प्रसीध्दीला हपापलेल्या नेत्यांपासुन संघटनेस फायदा तर कवळीचा नाही तोटा मात्र मोठा. तेव्हा कतृत्व व नेतृत्व याचा फारसा अभ्यास नसलेले नेतेच चळवळीचा कपाळमोक्ष करुन घेतात….
संतोष गवई
९७३००३५३२२