
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दर महिन्याच्या त्या चार पाच दिवसात स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता ठेवणं फार महत्वाचं असतं. याबाबत जनजागृती पसरवण्यासाठी २८ मे ला मासिक पाळी स्वच्छता दिन (Menstrual Hygiene Day) साजरा केला जातो. दर ३ ते ४ तासांनी पॅड्स बदलणं दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी फायद्याचं ठरते .
उद्देश
हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे मासिक पाळी संदर्भात महिला आणि मुलींमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि या विषयावर उघडपणे बोलता येईल. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेवर अधिक भर द्यायला हवा. याकाळात स्वच्छता न राखल्यास इन्फेक्शनचा धोका आहे. तसेच अनेक महिलांच्या इनफर्टिलिटी संबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात.
मासिक पाळीशी संबंधित काही समज-गैरसमज अजूनही लोकांमध्ये आहेत. ज्यावर उघडपणे चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे. दर महिन्यात येणाऱ्या पाळीमुळे स्त्रियांना बऱ्याचदा असामान्य त्रासाचा सामना करावा लागतो. पीरियड्समध्ये प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोन बदल होत असतात. ज्यामुळे काही स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो तर काही जणींना तुलनेनं कमी रक्तस्त्राव होतो. पण आवश्यकतेपेक्षाही जास्त रक्तस्त्राव होणे आरोग्याच्या दृष्टीनं चांगले नाही. यातही काही स्त्रियांमध्ये पाळी वेळेत न येण्याची समस्या अधिक प्रमाणात आढळते. पाच ते सात दिवस रक्तस्त्राव सुरू असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन (Estrogen and Progesterone) या दोन हार्मोनच्या पातळीतील असमतोलामुळे ही परिस्थिती निर्माण होते. या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
साधारणतः मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण २८ दिवसांचे हे गणित प्रत्येक महिलेला लागू होतेच असे नाही . काही स्त्रियांचे मासिक पाळीचे चक्र २४ दिवस किंवा ३८ दिवसांचे असते. पण ही बाब आरोग्याच्या दृष्टीकोनातून अजिबात सामान्य नाही. पाळीच्या तारखेपासून एक-दोन दिवस पुढे-मागे होणे, सामान्य बाब आहे. तुमच्या मासिक पाळीचे चक्र अनियमित असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण आवश्यक आहे.
पीरियड्सदरम्यान होणारा रक्तस्त्राव सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये जास्त असू शकतो. पण कालांतरानं यामध्ये बदल होत जातात.
– जसजसे वय वाढत जाते, तसतसे मासिक पाळीमध्ये बदल होत जातात. काही महिलांना रजोनिवृत्ती (मेनोपॉज) च्या काळात जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो.
जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होण्याची लक्षणे :
– प्रत्येक एक ते दोन तासांनंतर तुम्हाला एक किंवा अधिक पॅड बदलावे लागते.
– रक्ताच्या गुठळ्या प्रमाणे किंवा घट्ट स्वरुपात रक्तस्त्राव होणे.
-आठ दिवसांहून अधिक दिवस रक्तस्त्राव होणे.
यापैकी कोणतेही लक्षण तुमच्यामध्ये आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मासिक पाळीचा कालावधी बहुतेक महिलांसाठी तणावपूर्ण असतो. मासिक पाळीच्या दरम्यान आपल्या शरीरात अनेक बदल होतात….जसे की पोट फुगल्यासारखे वाटणे , स्तन हळवे होणे, डोके दुखी , झोप न लागणे , चिडचिड आणि थकवा , वजन वाढणे इत्यादी त्रास होतो . ही सर्व लक्षणें हॉर्मोन्स बादलांमुळे होतात. पाळीची तारीख जवळ येईल तासा मानसिक त्रास , शरीरिक त्रास वाढतो .
परंतु काही पथ्य पाळली तर हा त्रास कमी होऊ शकतो .
या दिवसांत स्वच्छता राखण्याची मोठी गरज आहे. निष्काळजीपणामुळे आपल्या आरोग्यावरच नकारात्मक परिणाम होऊन यीस्ट इन्फेक्शनसारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. यावेळेस 3-4 दिवस योनीमार्गातून रक्तस्त्राव होतो. शरीरिक व मानसिक थकवा असतो. आशावेळेस समागम केल्यास जास्त वेदना होतात व आरोग्याच्या दृष्टिने त्रासदायक असते. या काळात विश्रांती मिळावी म्हणून पूर्वीच्या काळी स्त्रियांना बाजूला बसवले जायचे . पण आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते तिला बाजूला बसणे शक्य नाही म्हणून त्रास होतो.
या दिवसांमधे स्त्रियांची पाचन अग्नी मंदावलेली असते त्यामुळे पचण्यास हलका आहार व नेहमी पेक्षा कमी आहार घ्यावे. तेलकट तळलेले व मसाले पदार्थ टाळावे . भाज्यांचे सुप , नारळपाणी , मोसंबी संत्री च्या रसाचे सेवन करावे . जेवण ताजे व गरम करावे . शिळे पदार्थ खाणे टाळावे . पालक , माठ, चकवत, राजगीर ,दूध , कडधान्य,फळे ,प्रोटीन युक्त आहार घ्यावे.
मसिकपाळीच्या दरम्यान वेदना कमी करण्यासाठी ओवा कोमट पाण्यातून घेणे – कोमट पाणी प्यावे , हिंगाचा वापर करावा ,ताक प्यावे इत्यादींनी पाचन सामान्य ठेवण्यास मदत होते .
मन प्रसन्न ठेवावे , सकारात्मक विचार करावे , रडणे , शोक करणे, अतिश्रामाची कामे टाळावीत . योग्य तेवढी विश्रांति घ्यावी.
– डॉ. विजयालक्ष्मी मुरुड – स्त्रीरोगतज्ज्ञ मासिक पाळी नैसर्गिक आहे. प्रत्येक सस्तन प्राण्याला ती येत असते. यात गर्भपिशवीचे अस्तर दर महिन्याला गळते . मासिक पाळीमधील रक्त आणि शरीरातील रक्त वेगळे असते. मात्र, हा केवळ गैरसमज आहे.
मासिक पाळीच्या काळात स्वच्छता न राखल्यास योनीमार्गातील इन्फेकशन बरोबर वध्यत्व सारखी समस्याही निर्माण होऊ शकते.
आंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं मासिक पाळीत रक्तस्त्राव कमजोर होतो, असा एक गैरसमज आहे. मात्र हे चुकीचं आहे. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण आंघोळ करू शकता. मासिक पाळीच्या दरम्यान आपल्या योनीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. स्वच्छ धुतल्याने योनीतील वास निघून जातो आणि इन्फेकशन ही होत नाही . गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपल शरीर शेकलं जात आणि खूप आराम मिळतो. अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वापर केला तर त्यांचं त्यांचं कौमर्य नष्ट होत. पण असे काही नाही.
जर मासिक पाळी अनियमित असेल तर याबाबत डॉक्टरांना माहिती देणेही तुमच्यासाठी सोयीचे ठरेल. यादरम्यान तुम्हाला कोणकोणत्या स्वरुपात त्रास होतात, हे तुम्ही डॉक्टरांना सहज सांगू शकता.
– पीरियड्समध्ये होणाऱ्या त्रासामुळे कधी-कधी तुम्ही शाळा किंवा ऑफिसमध्ये न जाण्याचा निर्णय घेता. ही लक्षणे तुम्ही नीट लक्षात ठेवून डॉक्टरांना सांगितली तर तुम्हाला योग्य ते औषधोपचार मिळू शकतील.
– या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. वेळीच उपचार करा.
डॉ. विजयालक्ष्मी मुरुड (एम.एस )
स्त्रिरोग तज्ञ
चंद्रा नर्सिंग होम , चंद्रा हाईटस , खडी मशीन चौक , कोंढवा कात्रज रोड ,कोंढवा बुद्रुक पुणे – 48
संपर्क क्रमांक- 9326208383