
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
इंधनावरील कर कपात करण्यासाठी भा.ज.पा.व भा.ज.यु.मो. यांचा राज्य सरकार विरोधात हल्लाबोल
अमरावती :- केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करताच भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे.राज्यातील इंधनावरील कर कमी करा,या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात अमरावती भाजपा व भा.ज.यु.मोर्चा यांनी घोषणा देत आंदोलन छेडले.
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री.विक्रांतजी पाटील यांच्या सुचनेनुसार सौ.निवेदिताताई दिघडे चौधरी जिल्हाअध्यक्ष भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्या मार्गदर्शनामध्ये व श्री.रमेशजी बुंदिले माजी आमदार श्री.कमलकांत लाडोळे माजी नगरअध्यक्ष श्री.मनीष मेन जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा श्री.रवी गोळे तालुकाअध्यक्ष युवा मोर्चा श्री.हर्षल पायघन शहरअध्यक्ष युवा मोर्चा यांच्या नेतृत्वामधे अमरावती ग्रामीण,अंजनगाव सुर्जी शहर व ग्रामीण युवा मोर्चा तर्फे राज्य सरकार विरोधात एल्गार आंदोलन दि.२६ मे २०२२ रोजी करण्यात आले.
फसव्या,विश्वासघातकी राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी न करता केंद्र सरकारनेच दिलेली सूट आणि त्यामुळे स्वाभाविक पणे राज्याचा कमी होणारा कर ही आमचीच सूट आहे असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे आणि राज्यातील १२ करोड जनतेची फसवणूक करीत आहे.
राज्य सरकारचा निषेध करीत पेट्रोल डिझेल किमती वरती किमान ५०% कपात करावी अशी मागणी करत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले व मा.तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राजेंद्र रेखाते सरचिटणीस भाजपा शहर,संदीप राठी भाजपा शहर,भास्कर माकोडे सरचिटणीस ग्रामीण संतोष काळे सरचिटणीस ग्रामीण,गजानन काळमेघ प्रदेश सदस्य,नितीन पटेल पं.स.सदस्य,केशवराव कळमकर नंदकिशोर काळे,विनोद दुर्गे जिल्हा सचिव अनिसुचीत आघाडी,विक्रम पाठक जिल्हा सचिव अमरावती ग्रामीण,गौरव चांदुरकर,निखिल श्रीवास्तव,रितेश आवंडकर,मनोहर भावे,रतन भास्कर,मिलिंद गोतमारे,गणेश बोडखे,अभिषेक पटेल,अमोल काळे,अविनाश रेखाते,नंदकिशोर काळे,मधुकर गुजर,सचिन जायदे,सप्नील घोगरे,योगेश भारडे,निवृत्ती सावरकर,सचिन बोबडे,रवींद्र बारब्दे,सतिश मट्टे,निलेश इखार,विठ्ठल पळसपगार,प्रशांत निवाने,मनोहर मुरकुटे,आशिष चांदूरकर,अच्युत काळमेघ,गोपाल बुंदीले व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे सर्व नागरीक त्रस्त झाले आहेत.सद्यस्थितीत केंद्र सरकारचा कर १९ रुपये तर राज्य सरकारचा ३० रुपये एवढा असून ह्या महागाई पासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधून पेट्रोलमध्ये ९.५ व डिझेलमध्ये ७ रुपये कर जनतेकरिता कमी केलेला आहे.ह्यामुळे केंद्र सरकारला जवळपास २ लाख कोटींपेक्षा जास्त भार बसणार आहे.परंतु जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे आक्रमक पाऊल उचलले आहे.
मा.नगराध्यक्ष कमलकांतजी लाडोळे
अंजनगाव सुर्जी
महाराष्ट्र राज्य सरकार संपुर्ण देशामध्ये पेट्रोल व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असून जनतेच्या हितासाठी व महागाईत जनतेला दिलासा देण्यासाठी तात्काळ इंधनावरील कर आकारणी कमी करण्यात यावी संपुर्ण देशातील इतर राज्य १७-१८ रुपये कर आकारात असतांना महाराष्ट्र राज्य सरकारमधील महाविकास आघाडीने एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करणे योग्य आहे का?हा जनतेवर होणारा अन्याय आहे.
माजी आ.रमेशजी बुंदीले
राज्य सरकारने इंधनावरील आकारण्यात येणारा कर लवकरात-लवकर कमी करावा जेणेकरून महागाईला आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल.जर का हे पाऊल राज्य सरकारने तात्काळ उचलले नाही तर संपुर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि ह्याकरिता महाविकास आघाडी संपुर्णपणे जबाबदार राहील.
मनीष मेन
जिल्हाध्यक्ष,भा.ज.यु.मोर्चा
अमरावती ग्रामीण
सामान्य जनतेच्या महागाईतून सुटका करायची ही आमच्या मोदी सरकारची जरी प्रामाणिक इच्छा असली तरी महाविकास आघाडी सरकार “आवळा देऊन कोहळा” देण्याचा प्रकार करीत आहे.आम्ही जनतेवर होणारा हा अन्याय कदापि सहन करणार नाही.
रवी पाटील गोळे
तालुकाध्यक्ष,भा.ज.यु.मो.
अंजनगाव सुर्जी