दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर .
पुणे : पुणे शहर लीगल सेलचे अॅड. असीम सरोदे यांनी सहकाऱ्यांसह सुप्रिया सुळेंच्या बदनामीविषयी राज्य महिला आयोगाला आज एक निवेदन दिले. त्यानुसार चंद्रकांतदादा पाटील यांना लेखी खुलासा मागण्यात आला आहे. ओबीसी आंदोलना दरम्यान पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सुप्रियाताई सुळे यांचे विरोधातील काही आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानुसार आयोगाने पाठविलेल्या नोटिसीमध्ये आपल्या सारख्या जबाबदार लोक प्रतिनिधीने अशी बेजबाबदार वक्तव्ये करणे समाज हीताचे नाही असे बजावले. तसेच त्यांना महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार दोन दिवसात लेखी खुलासा करावा असे सांगण्यात आले आहे


