
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
- मोखाडा:-ग्रामपंचायत बेरीस्ते मधील महसूल गाव बेरीस्ते आणि पाड्यांसाठी नव्याने मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपुरवठा होणाऱ्या जागेत बदल करावा अशी ग्रामसभेत लोकांची मागणी होती त्यावेळी प्रशासक तुषार सुर्यवंशी यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की आपण सर्व मिळून प्रत्यक्ष जागेची पाहणी करु आणि ज्या ठिकाणी जलसाठा बारा महिने उपलब्ध राहील त्याठिकाणाहुन पाणीपुरवठा करु, त्याकरीता आज प्रत्यक्ष जागेची पाहणी करून जलसाठा असलेले ठिकाण बघितले आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ह्याच ठिकाणावरून पाणीपुरवठा करणे असे ठरवले.