दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
अहमदनगर :– अहमदनगर जिल्हामध्ये मंथन परिक्षा घेण्यात आली होती. मंथन परिक्षेत यशराज बिरादार याने अहमदनगर जिल्हा तून पहिला आल्यामुळे मंथन परिक्षा मंडळ्यांने यशराज बिरादार यांना गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले आहे. यशराज इंग्रजी भाषेत शिक्षण घेतले आहे परंतु मराठी भाषेत तो शिक्षण घेत नसतानाही एक दिवस सुद्धा शाळा न करता न चुकता आॅनलाईन शिक्षण घेतले आहे.त्याचेअॅडमिशन आॅनलाईन झाले होते.त्याने या अगोदर स्केटिंग करण्यामध्ये तर तो माहीर आहे. विदर्भ विभागात पहिला आल्यामुळे गोल्ड मेडल भेटले आहे. पुन्हा त्याला गोल्ड मेडल देण्यात आले आहे. त्याच्या या निवडीचे श्रेय आईवडिलांना देण्यात येते कारण शाळा बंद असल्याने पालकांनी यशराज चा अभ्यास करून घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. यशराज बिरादार व श्री गणेशराव बिरादार, सौ. प्रतिभा बिरादार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे


