
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या हुंडा रोषमाळ येथे आजी माजी जि.प सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे अ. कुवा आगाराची बससेवा सुरु झाल्याने गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले असून ह्या बससेवे मुळे आजूबाजूच्या गावातील व नर्मदा पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.चोवीस पूर्वी या गावाला शहादा आगारातून बस देण्यात आली होती. परुंतु या गावाला शहादा आगाराने केराची टोपली दाखवत बससेवाच बंद केल्याने इथल्या नागरिकांना मिळेल त्या वाहनाने,जादा भाडे देऊन जीवघेणा प्रवास करावा लागायचा परुंतु अ.कुवा आगाराच्या बससेवा सुरु झाल्याने २४ वर्षापासूंन लालपरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची प्रतिक्षा संपली असल्याची भावना गावकरी नागरिक व्यक्त करीत आहेत. ही बस मुक्कामी असून याचा मार्ग अक्कलकुवा मोलगी धडगाव हुंडा रोषमाळ असा रूट असणार आहे. या बससेवेमुळे नर्मदा काठावरील रोषमाळ खुर्द, दु डुठ्ठल,चिचकाठी, बोरसिसा, गोराडी, पिप्री, आमलीपाणी, अट्टी, केली, थुवाणी, भरड, सिक्का, कुंबरी, अकवाणी, नळगव्हण, कुकतार, जलोला अशा १९ गावातील नागरिकांना बससेवेचा लाभ होणार आहे.
या यावेळी सौ.संगिताताई पावरा जि.प.सदस्य.नंदुरबार, श्री.हारसिंग मल्या पावरा माजी.जि.प.सदस्य, श्री.वडनेरे , बाजीराव वसावे आगरलेखाकार, दौलत पाडवी वाहतुक नियञंण अधिकारी अक्कलकुवा डेपो, के.पी.पाटील चालक, जयसिंग तडवी वाहक, तसेच नर्मदा परिसर विकास बहुउद्देशीय संस्था रोषमाळ खुर्द,
बलसिंग पावरा सेवानिवृत्त कर्मचारी,विजय पावरा पोलीस पाटील, लालसिंग पावरा, बाबुलाल बारदु पावरा सर,शामसिंग पावरा,नाना पावरा, जयवंत पावरा,
रविंद्र पावरा, सुकलाल पावरा, मोहन शामसिंग पावरा, संतोष पावरा, जयसिंग पावरा, अनिल पावरा, मोहन बलसिंग पावरा, छोटुलाल पावरा, लक्ष्मण पावरा, आपसिंग पावरा, पंडित पावरा, निलेश पावरा, कैलास पावरा, विलास पावरा, किसन पावरा उमराणी, गोपाल पावरा उमराणी, गोवित वसावे हुंडा रोषमाळ परिसरातील ग्रामस्थ उपस्थिती होते.